प्रतिनिधी/सांगली
सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो रिट पिटीशन (सिव्हील) क्र. (एस) 6/2020 मध्ये स्थलांतरीत कामगारांकरीता करावयाच्या कार्यवाहीबाबत केंद्र शासन, राज्य शासन, केंद्रशासीत प्रदेश यांना निर्देश दिले आहेत. निर्देशांचे अनुपालन करण्याच्या दृष्टीने स्थलांतरीत कामगारांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देणे, त्यांचे विविध प्रश्न, अडचणी व समुपदेशनासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन सांगली येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त ए. डी. गुरव यांनी दिली.
सरकारी कामगार अधिकारी एम. व्ही. सोनार यांची केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 0233-2672046 असून संबंधितांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहनही गुरव यांनी केले आहे.