कर्नाटक राज्य मुन्सिपल कर्मचारी संघाची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायत, नगरपरिषद यासह इतर ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या कर्मचाऱयांना नोकरीत कायमस्वरुपी करून वेतनवाढ द्यावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य मुन्सिपल कर्मचारी संघाने मंगळवारी विधानसौधसमोर आंदोलन छेडले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारे सफाई कर्मचारी, वॉटरमन, कचरा ऑटोचालक, कार्यालय साहाय्यक, संगणक ऑपरेटर आदी कर्मचाऱयांना समान वेतन देण्यात यावे. कर्मचारी मागील दहा वर्षांपासून सेवासुरक्षा, समान वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे. कर्मचाऱयांना समान वेतन लागू करावे. याबरोबरच लोकसंख्येनुसार कर्मचाऱयांची संख्या वाढवावी, मृत्यू झालेल्या कर्मचाऱयाच्या कुटुंबीयांना नोकरीत प्राधान्य द्यावे, 500 लोकांमागे एका सफाई कर्मचाऱयाची नेमणूक करावी. यासह गृहभाग्य योजनादेखील कर्मचाऱयांना मिळाली नाही. तसेच कर्मचाऱयांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, मास्क, हातमोजे, गमबूट, सुरक्षा पोशाख पुरवा, अशी मागणीही कर्नाटक राज्य मुन्सिपल कर्मचारी संघाने निवेदनाद्वारे केली आहे.