वार्ताहर / डिगस:
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक परिक्षा उत्तीर्ण झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुशिक्षित बेरोजगारांना बांधकाम विभागाकडून दहा लाखापर्यंत विना निविदा कामे मिळावीत व जिल्हा स्तरीय कामवाटप समितीतर्फ कामाचे वाटप करून मिळावे अशी मागणी संघटनेच्या वतीने आमदार वैभव नाईक याbच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुbबई याbच्या अभ्यासक्रमातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हि परीक्षा उत्ताrर्ण झालेले जिल्हय़ात अनेक बेरोजगार युवक आहेत. या युवकांना जिल्हा पाfरषद बांधकाम वर्ग 7 चे साडेसात लाख आणि सार्वजनिक बांधकामाचे वर्ग सात चे 10 लाखापर्यंत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. नोंदणी धारक बेरोजगार युवकांना बांधकाम विभागाचा कोटा नसल्याने खुल्या निविदेमध्ये सहभाग घ्यावा लागतो. शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे ई-निविदा दहा लक्ष वरील कामांना लागू असल्याने नोंदणीकृत बेरोजगाराbना काम मिळत नाहि. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बेरोजगार असलेल्या नोंदणी धारकांना 15 टक्के कामाचा कोटा मंजूर करून मिळावा. हा कोटा निश्चित करून त्यांना काम मिळावे. एकूण कामाच्या पंधरा टक्के कोटा निश्चित करावा. तसेच मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना ज्याप्रमाणे काम वाटप समितीकडून कामे वाटप करून दिली जातात. तशीच कामे कॉन्स्ट्रुकशन सुपरवायझर उत्तीर्ण नोंदणीकृत विद्याथ्याना काम वाटप समितीतर्फे कामाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनिल जाधव, सचिव नरेंद्र राणे, संचालक इमाम नावलेकर, वसंत यादव, अवधूत भोगले, गौरव मुळीक व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.