सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वतीने चार जानेवारीस ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. ऑनलाईन महासभा घेण्यावरुन सदस्य आणि प्रशासनात वाद सुरु असताना आता लोकशाही दिनही ऑनलाईन घेण्याचे नियोजन केले आह
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेचा लोकशाही दिन ता. ४ जानेवारी रोजी सकाळी १९ ते १२ या वेळेत ऑनलाईन आयोजित केलेला आहे.
ज्या तक्रारदारांनी लोकशाही दिनामध्ये आपले अर्ज ता. २० डिसेंबर पूर्वी सादर केले आहेत. त्यातील निकषाप्रमाणे जे अर्ज पात्र ठरतील त्यांना महापालिका प्रशासनकडून कळवण्यात आले आहे. अशा अर्जदारांनी त्यांच्या मोबाईलवरील लिंकवरून लोकशाही दिनास उपस्थित रहावे. ऑनलाईन सुनावणीबाबत काही शंका आल्यास प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापूरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.