प्रतिनिधी/ म्हापसा
गोवा फरवर्डचे आमदार जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांची आवश्यकचा सध्या पक्षात नाही आहे. आम्ही 27 आहोत स्थिर सरकार आहे. सध्याच्या कोविड परिस्थितीतून बाहेर सरण्याच्या अन्य सहा महिने जाणार आहे. अन्य दोघांना घेऊन वजन का वाढवूया असा टोला मंत्री मायकल लोबो यांनी मारला. भाजपात अन्य दोन आमदार घेण्यात येईल का? असा प्रश्न मंत्री मायकल लोबो यांना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी वरील माहिती बोलताना दिली.
पुढे बोलताना मंत्री मायकल लोबो म्हणाले की, शिवोलचे आमदार विनोद पालयेकर व आम्ही मित्र आहोत. ते एक चांगले माणूस आहेत. जयेशही चांगला माणूस आहे. ते कधी कधी काय करतात ते त्यानाच माहीत नाही. ते सैराभैरा झालेल्याप्रमाणे वागतात. ते त्यांनी बंद करून इथला तिथला विचार न करता आता लोकांबरोबरच राहायला पाहिजे. पूर्वी ते काँग्रेस नंतर गोवा फॉरवर्ड व आता भाजपात प्रवेश घ्यायला पाहत आहेत. त्यांना तोलामोलाचा खेळ खेळू नये. असा सल्ला लोबो यांनी दिला. त्यांचे डोके स्थिर नाही. अस्थिर डोके राजकारणात घातक आहे. आपण साळगावात काहीतरी राजकारण करणार म्हणून ते घाबरतात. मी काही करणार नाही हे साळगावचे लोकच सर्वकाही करून दाखविणार असे ते म्हणाले.
गेवा फॉरवर्डचे दोघे आमदार जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांची भाजपमध्ये येण्यासाठी धडपड सुरू होती मात्र त्यामागे आपला काहीच हात नाही. भाजप पक्ष त्यांना भाजपात घेतात, घेऊ दे. तिकीट देतात देऊ दे. आपण त्यांच्यात मुळीच पडणार नाही, अशी स्पष्ट माहिती मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांना दिली. ते समजतात मी इतका महत्त्वकांक्षी आहे तर Thank You very much.
रेस्टॉरंट सुरू तर बार खुली करण्यास काय आहे
रेस्टॉरंट सुरू करण्याचा आदेश केंद्रातून आला आहे. बार खुली करणे आता सहज शक्य आहे. रेस्टॉरंट खुली करतात तर मग बार का नाही. राज्यात दारूची गोव्याच्या नागरिकांसाठी गरज आहे असे पत्र केंद्राला लिहिणारा मी पहिला आमदार आहे. त्याची राज्यासाठी गरज आहे. मुख्यमंत्र्यांशीही आपण याबाबत बोललो आहे त्यास त्यांनीही मान्यता दिली आहे. मुख्यमंत्रीही केंद्राला याबाबत लेखी पत्र लिहीणार असल्याची माहिती मंत्री लोबो यांनी दिली.
वैयक्तिकरीत्या हॉटेल खुली करण्यास आपला विरोध
दोन दिवसापूर्वी पॅबीनेटमध्ये हॉटेल उघडण्यास मान्यता दिली आहे. इंडस्ट्रीच्या दबावामुळे सरकारने हॉटेल खुली करण्यास मान्यता दिली आहे. वैयक्तिकरीत्या आपले मत विचारल्यास आपला यास साफ विरोध आहे. सध्याच्या परिस्थितीत हॉटेल खुली करण्यास निदान एक महिना तरी जायला पाहिजे. इंडस्ट्री याबाबत सर्व काही बोलत असले तरी आपले वैयक्तिक मत वेगळे आहे. राज्यात जे पर्यटक दरवर्षी येतात तेथील देशात कोविड आज वाढलेला आहे. अद्याप तेथील स्थिती कमी झाली नाही. इंडस्ट्रीत मुख्यमंत्र्यांवर दबाव आणीत आहेत. पर्यटनावर अनेकजण अवलंबून आहेत. जर खुली करीत आहेत तर ते पर्यटक येणार असा त्यांचा विचार आहे. मात्र हे पर्यटक येऊन काय करणार. या महिन्यात संसर्ग वाढत आहे. पुढे जाऊन तारखेत बदलही होऊ शकतो वा हॉटेल्स बंदही पडू शकतात असे संकेत मंत्र्यांनी दिले.
राज्यात अन्य लॉकडाऊन होणार नाही
राज्यात लॉकडाऊन हा उपाय नाही. आम्ही त्यातून बाहेर आलो आहोत. सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. तिथल्या परिसरावर लक्ष ठेवूया. लॉकडाऊनमध्ये काय करणार राज्य देश लॉकडाऊन केला तरी केसेस वाढणारच. लॉकडाऊन पुन्हा गोव्यात होणार नाही. मार्च, एप्रिल, मे गर्मीचे दिवस असल्याने तेव्हा राज्यात रुग्ण वाढले नाही. मात्र बाहेरच्या लोकांनी राज्यात संसर्ग आणला. गेवा फॉरवर्डचे दोघे आमदार जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांचे भाजपमध्ये येण्यासाठी धडपड सुरू होती मात्र त्यामागे आपला काहीच हात नाही. भाजप पक्ष त्यांना भाजपात घेतात, घेऊ दे. तिकीट देतात देऊ दे. आपण त्यांच्यात मुळीच पडणार नाही, अशी स्पष्ट माहिती मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांना दिली. ते समजतात मी इतका important आहे तर Thank You very much.साळगावच्या नागरिकांना या प्रकल्पात विस्तारीकरण नको. मी त्याकडे लक्ष देणार आहे कारण मी सध्या कचरा व्यवस्थापन मंत्री आहे आणि आपले ते कर्तव्य आहे.