नवी दिल्ली
भारतीय भांडवली बाजारात उतरण्यासाठी आणखी एक कंपनी उत्सुक आहे. स्नॅपडील या ई-कॉमर्स रिटेलर कंपनीला आपला आयपीओ बाजारात आणायचा आहे. सदरच्या आयपीओतून कंपनीला 3 हजार कोटी रुपये उभारायचे आहेत. सदरचा आयपीओ कंपनी पुढील वर्षारंभी सादर करण्याची शक्यता सांगितली जात आहे. 2010 मध्ये सुरु झालेल्या या कंपनीचे मुख्यालय गुरगावात आहे. या प्लॅटफॉर्मअंतर्गत 6 कोटी उत्पादने कंपनीकडे नोंदणी आहेत.