दुबईतील आशियाई युवा व कनिष्ठ मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये होणाऱया आगामी आशियाई युवा तसेच कनि÷ांच्या पुरुष व महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची किमान 21 पदके प्रत्यक्ष रिंगमध्ये उतरण्यापूर्वीच निश्चित झाली आहेत. कोरोना समस्येमुळे हवाई प्रवासावर निर्बंध असल्याने आशिया खंडातील बऱयाच देशांच्या स्पर्धकांचे या स्पर्धेत सहभागी होण्याचे मनसुबे उधळले गेले आहेत. सहभागी स्पर्धकांचे प्रमाण बरेच कमी झाल्याने सपर्धा सुरु होण्यापूर्वीच भारत पदकाची लयलूट करणार, हे निश्चित झाले.
या स्पर्धेत भारताचे 73 जणांचे पथक सहभागी होणार आहे. कनि÷ आणि युवा अशा दोन विभागांसाठी पुरुष विभागात दोन गट त्याचप्रमाणे महिला विभागात दोन गट सहभागी होत आहेत. सदर स्पर्धेमध्ये विविध देशांचे सुमारे 250 मुष्टियोद्धे भाग घेणार आहेत. कोरोना चाचणीमुळे बऱयाच स्पर्धकांची सुरुवातीची प्रवास योजना बारगळली आहे.
र्गुंरुवारी रात्री भारताचे 23 जणांचे एक पथक दुबईला रवाना झाले. 25 जणांचे दुसरे भारतीय पथक शुक्रवारी सकाळी विमानाने दुबईत दाखल झाले. उर्वरित 25 जणांचे एक भारतीय पथक शुक्रवारी सायंकाळी दुबईला प्रयाण करणार असल्याची माहिती भारतीय मुष्टियुद्ध संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. शुक्रवारी सकाळी या स्पर्धेसाठी रवाना झालेल्या 25 जणांच्या भारतीय पथकामध्ये प्रामुख्याने प्रशिक्षकवर्ग तसेच दोन मुष्टियोद्धय़ांचा समावेश आहे.
भारतातर्फे रोहित चेमोली (48 किलो गट), मोहम्मद उस्मान (50 किलो), निखिल (54 किलो), अनशूल (57 किलो), प्रित मलिक (63 किलो), अंकुश (66 किलो), गौरव सैनी (70 किलो), नक्ष बेनिवाल (75 किलो) आणि ऋषभ सिंग (81 किलो) हे भारतीय मुष्टियोद्धे शुक्रवारी सायंकाळी सलामीच्या लढतीत सहभागी होणार आहेत. या लढतीतील विजयी स्पर्धकांचे स्पर्धेतील पदक निश्चित असेल.
या स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला विभागाकरिता काढण्यात आलेला ड्रॉ लहान असून त्याचा फायदा महिला मुष्टियोद्धय़ांना अधिक मिळणार आहे. युवा विभागातील किमान पाच महिला स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी थेट प्रवेश निश्चित मिळेल. त्यामुळे हे स्पर्धक किमान रौप्यपदक मिळवू शकतील. उर्वरित चार स्पर्धकांना कास्यपदकाची खात्री राहील. भारतातर्फे दीपिका (81 किलो), खिशी (75 किलो), नेहा (54 किलो), तमन्ना (50 किलो) आणि निवेदिता कर्की (48 किलो) यांना थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळविता येईल. दरम्यान, भारताच्या लेशू यादव (70 किलो), स्नेहा कुमारी (66 किलो), प्रिती दाहिया (60 किलो) आणि सिमरन वर्मा (52 किलो) यांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल.
अमिन सिंग, विशाल उपांत्य फेरीत
पुरुषांच्या युवा विभागात भारताचे अमीन सिंग (92 किलोवरील), विशाल (80 किलो) यांनी यापूर्वीच सदर स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली असून त्यांचे किमान कास्यपदक निश्चित झाले आहे. कनि÷ांच्या पुरुष विभागात भारताचे स्पर्धक कीर्ती (81 किलोवरील), प्रांजल यादव (75 किलो), माही राघव (63 किलो) आणि आंचल सैनी (57 किलो) यांना लहान ड्रॉ फायदेशीर ठरला असून ते अंतिम फेरीत प्रवेश करतील. कनिष्ठांच्या महिला विभागात भारताच्या संजना (81 किलो), रुद्रिका (70 किलो), सुप्रिया रावत (66 किलो), निकिता चंद (60 किलो), अरसू (54 किलो), तानू (52 किलो) आणि देविका सत्यजीत (50 किलो), विशू राठी (48 किलो) आणि मुस्कान (46 किलो) यांनी थेट उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.
दुबईत होणाऱया या स्पर्धेत 18 देशांचे स्पर्धक सहभागी होणार आहेत. कोरोना महामारी निर्बंधामुळे बऱयाच देशांच्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता आलेले नाही.