अमेरिकेत राहणारी कियानी एरोयो एका विशेष मोहिमेवर आहे. लेस्बियन दांपत्याची मुलगी कियानी का स्पर्म डोनरच्या मदतीने जन्मली होती. स्वतःसोबत घडलेल्या एका घटनेनंतर तिने जगभरातील स्वतःच्या भावंडांना शोधून काढण्याचा आणि त्यांच्या संपर्कात राहण्याचा निश्चय केला होता.
लहानपणी बरोबरच्या मुलांच्या कुटुंबात आईवडिल असल्याचे आणि माझ्या कुटुंबात पालक म्हणून माझ्या दोन्ही माता असल्याचे जाणवायचे. मला माझ्या वडिलांबद्दल काही गोष्टी माहिती होत्या, त्यांना कला आणि क्रीडाप्रकारांमध्ये मोठी आवड असल्याचे कळले होते. लहानपणापासूनच मला वडिलांची उणीव भासायची. मी स्वतःच्या स्पर्म डोनर वडिलांसाठी फादर्स डे कार्ड्स तयार करत होते. अनेक वर्षांपर्यंत त्यांची प्रोफाइल गुप्त असल्याने त्यांच्यामुळे जन्मलेली मुले त्यांच्याशी संपर्क साधू शकत नव्हते असे कियानीने सांगितले आहे.
पण कियानीचा एक डोनर कंपनीसाठी प्रमोशनल व्हिडिओ पाहून तिच्या वडिलांनी स्वतःचा निर्णय बदलला होता. त्यानंतर कियानीच्या डोनरने स्वतःची ओळख जाहीर केली होती. 18 वर्षांची झाल्यावर कियानीने स्पर्म डोनरद्वारे जन्मलेला भावाबहिणींचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. स्पर्म बँकेशी संपर्क साधल्यावर तिला स्वतःच्या भावाबहिणींबद्दल माहिती मिळाली आणि ती त्यांना शोधू लागली.
एका कुटुंबात दोन जुळय़ा मुली जन्माला आल्या होत्या. त्या माझ्यापेक्षा लहान होत्या. या मुली देखील माझ्या डोनरमुळेच जन्मल्या होत्या. या मुलींसोबत वेळ घालवून मला खूप चांगले वाटले. आतापर्यंत मला 63 भावंडं मिळाली आहेत. ती अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये फैलावलेली आहेत असे ती सांगते कियानाचे शहर फ्लोरिडामध्ये तिची 12 भावंडं राहतात. ती अनेकदा त्यांना भेटायला जाते.