जगातील सर्वात धोकादायक फूल अन् रोप
सुंदर फुल आणि रोप लोकांच्या मनाला मोहित करून सोडतात. फुलांचा गंध लोकांना वेड लावतो. परंतु या जगात अशी अनेक फुले आणि रोपे आहेत, ज्यांना केवळ स्पर्श केल्याने माणसाचा मृत्यू ओढवू शकतो.
एकोनिटम रोप
एकोनिटमला जगातील सर्वात धोकादायक रोप मानले जाते. हे माणसाच्या हृदयाची गती कमी करते, यामुळे त्याचा मृत्यू ओढवू शकतो. या रोपाच्या मूळ आणि पानामंध्ये विष असते, दोघांमध्यही न्यूरोटॉक्सिन आढळून येते. हे विष मेंदूला प्रभावित करते. याचे फुल, पान किंवा मूळ त्वचेच्या संपर्कात आल्यास त्या हिस्स्यात वेदना होण्यास सुरुवात होते.
हॉगवीड फुल
हॉगवीड हे विषारी फुलांमध्ये सामील आहे. हे फुल त्वचेच्या संपर्कात आल्यास आणि त्यावर सूर्यकिरणे पडल्यास यामुळे होणारी रिऍक्शन धोकादायक ठरू शकते. यामुळे त्वचेवर पुरळ उठू लागतात आणि त्वचेचा दाह सुरू होतो. यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचाही धोका असतो.
मॅनकीनील रोप
मॅनकीनीलच्या रोपाला अत्यंत धोकादायक मानले जाते आणि ते फ्लोरिडा तसेच कॅरेबियन बेटांमध्ये आढळून येते. याला हिप्पोमाने मॅनकीनिला नावानेही ओळखण्यात येते. या रोपावर फळेही लागत असतात. हे रोप इतके धोकादायक आहे की यावर पडणारा पाण्याचा थेंब देखील विषारी होऊन जातो. याच्या धुरामुळे माणूस आंधळा होऊ शकतो आणि श्वसनाचा आजार सुरू होण्याची भीती असते.
रिकिनस कोमूनिस
धोकादायक रोपांमध्ये रिकिनस कोमूनिसचा समावेश आहे. याला रायसिन या नावानेही ओळखण्यात येते, याच्या बीजापासून तेल तयार केले जाते, यामुळे मेटाबॉलिजमच्या पेशी संपून जातात. तसेच यामुळे उलटी आणि अतिसाराचा त्रास सुरू होतो. एक आठवडय़ात हा त्रास कमी न झाल्यास माणसाचा जीव देखील जाऊ शकतो.
अबरीनचे रोप
अबरीनचे रोप देखील अत्यंत धोकादायक मानले जाते. हे लाल रंगाच्या बेरीप्रमाणे दिसते आणि जीवघेणे ठरू शकते. या रोपावर लागणाऱया फळामधील बिया अत्यंत धोकादायक असतात. त्यांचे सेवन करणाऱया व्यक्तीचा मृत्यू ओढवू शकतो.