मुंबई
हवाई उद्योगातील कंपनी स्पाइसजेटने आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीत निव्वळ तोटय़ात वाढ नोंदवली आहे. कंपनीने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत 833 कोटी रुपयांचा तोटा सहन केला असून तो 46 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे कंपनीपुढचे चिंतेचे ढग वाढलेले आहेत. वाढलेल्या इंधनाच्या किमती, प्रवासी क्षमतेवर मर्यादा त्याचप्रमाणे रुपयाची घसरण या साऱयाचा परिणाम कंपनीच्या तोटय़ावर दिसला आहे. दुसऱया तिमाहीत कंपनीचा खर्च 1226 कोटी रुपयांवर
राहिला आहे, जो मागच्या वर्षीच्या समान अवधीच्या तुलनेत दुप्पट आहे.