गुरूग्राम
हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाईस जेटने कॉम्पॅक्ट, पोर्टेबल, नॉन-इन्वेसिव्ह व्हेंटिलेटर बाजारात दाखल केले आहे. मध्यम आणि हलक्मया स्वरूपाचा श्वास घेण्यास अडचण येणाऱयांसाठी हे उत्पादन उपयोगी ठरणारे आहे. याव्यतिरिक्त स्पाइसजेटने फिंगरटिप पल्स ऑक्सीमीटर हे उपकरणही सादर केले आहे. या उपकरणामार्फत एखाद्याच्या शरीरात ऑक्सिजनची क्षमता किती आहे हे सहजपणे समजू शकते. स्पाइस जेटची सहाय्यक कंपनी स्पाइसजेट टेक्नीकच्या इंजिनियर्सने ही दोन्ही उपकरणे विकसित व डिझाईन केली आहेत. मेड इन इंडिया अंतर्गत सदरची उपकरणे तयार करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय एजन्सी टीयुव्हीचे प्रमाणपत्र कंपनीने मिळवले आहे. आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत कंपनीने ही उपकरणे सादर केली असून हवाई प्रवास करणाऱया प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होईल. या उपकरणांचा उपयोग घरासह ऍम्बुलन्स, सेनेचे बेस कॅम्प, इस्पितळे अशा ठिकाणी वापर करता येत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.