नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
रशियाची लस स्पुतनिक व्हीचे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड आणि पॅनेसिया बायोटेकने मिळून ही लस बनविण्यास आजपासून सरुवात केली आहे. पॅनेसिया बायोटेक वर्षाला 10 कोटी डोस बनविणार आहे.
या लसीविषयी माहिती देताना आरडीआयएफने सांगितले की, पॅनेसिया बायोटेकने बनविलेली लसीची पहिली बॅच ही क्वालिटी कंट्रोलसाठी स्पुतनिक व्ही विकसित करणाऱ्या रशियाच्या इन्स्टिट्यूट ऑफ गॅमेलियाला पाठविली जाणार आहे. यानंतर या लसीचे पूर्ण क्षमतेने उत्पादन लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
रशियाची ही लस पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये वेगवेगळे एडेनोव्हायरसचा वापर केला जातो. ही लस 65 देशांमध्ये रजिस्टर झाली असून ही लस कोरोनावर 91.6 टक्के परिणामकारक आहे.