वृत्तसंस्था / कॅलिफोर्निया (अमेरिका)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या चौथ्या मानांकित राफेल नदालने आपली विजयी घोडदौड कायम राखत एकेरीची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत अमेरिकेच्या जॅक सॉक आणि जॉन इस्नेर या जोडीने पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
शनिवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात नदालने स्पेनच्या ऍल कॅरेझचा 6-4, 4-6, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता नदाल आणि अमेरिकेचा फ्रीझ यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. नदालला उपांत्य फेरीच्या सामन्यातील विजयासाठी तब्बल तीन तास झगडावे लागले.
पुरूष दुहेरीच्या प्रकारात अमेरिकेच्या जॅक सॉक आणि जॉन इस्नेर यांनी अंतिम सामन्यात सॉक आणि इस्नेर यांनी मेक्सिकोचा गोंझालेंझ आणि फ्रान्सचा व्हॅसेलिन यांचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव करीत जेतेपद पटकावले.
2022 च्या टेनिस हंगामात नदालने आतापर्यंत सलग 20 सामने जिंकले आहेत. नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 21 विक्रमी ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. गेल्या जानेवारीत नदालने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.
तसेच त्याने आतापर्यंत 36 एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेतील अजिंक्यपदे मिळविली आहेत. दुसऱया उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या 20 व्या मानांकित टेलर फ्रीझने रशियाच्या रूबलेव्हचा 7-5, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. फ्रीझने अलिकडच्या कालावधीत सलग 13 सामने जिंकले आहेत.
पुरूष दुहेरीच्या प्रकारात अमेरिकेच्या जॅक सॉक आणि जॉन इस्नेर यांनी अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात सॉक आणि इस्नेर यांनी मेक्सिकोचा गोंझालेंझ आणि फ्रान्सचा व्हॅसेलिन यांचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेत सॉक आणि इस्नेर या जोडीने दुसऱयांदा दुहेरीचे विजेतेपद मिळविले असून यापूर्वी त्यांनी 2018 साली या स्पर्धेत पहिल्यांदा विजेतेपद मिळविले होते. या जोडीने एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेत आतापर्यंत तीनवेळा दुहेरीतील अजिंक्यपदे मिळविली आहेत.