वृत्तसंस्था/ ऍकापुल्को (मेक्सिको)
एटीपी टूरवरील शनिवारी येथे झालेल्या ऍकापुल्को पुरूषांच्या 500 दर्जाच्या खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना ब्रिटनच्या कॅमेरून नुरीचा पराभव केला.
ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकाविणाऱया नदालने अंतिम सामन्यात कॅमेरून नुरीवर 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये मात केली. या स्पर्धेतील नदालचे हे चौथे विजेतेपद आहे. 2005, 2013 आणि 2020 साली नदालने या स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले होते. या स्पर्धेत सर्वाधिक वेळा जेतेपद मिळविणाऱया टेनिसपटूंच्या यादीत आता डेव्हिड फेरर, ऑस्ट्रीयाचा थॉमस मस्टर आणि स्पेनचा नदाल यांचा समावेश आहे.