वृत्तसंस्था/ मेलबर्न
रविवारी येथे झालेल्या मेलबर्न समरसेट पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉप सीडेड राफेल नदालने एकेरीचे जेतेपद पटकाविताना अमेरिकेच्या क्रेसीचा पराभव केला.
एटीपी टूरवरील 250 दर्जाच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात नदालने क्रेसीचे आव्हान 7-6 (8-6), 6-3 असा पराभव केला. गेल्या ऑगस्टनंतर नदाल पहिल्यांदाच टेनिस क्षेत्रात या पस्पर्धेत ऱखेळत होता. हा अंतिम सामना 100 मिनिटे चालला होता.