वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या शिकागो फॉल क्लासिक महिलांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद स्पेनच्या द्वितीय मानांकित गार्बिन मुगुरूझाने पटकाविताना टय़ुनिशियाच्या जेबॉरचा पराभव केला.
दोनवेळा ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपद मिळविणाऱया तसेच 28 व्या वर्षांत पदार्पण करणाऱया स्पेनच्या मुगुरूझाने अंतिम सामन्यात जेबॉरचा 3-6, 6-3, 6-0 असा पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील मुगुरूझाचे हे नववे विजेतेपद आहे. गेल्या मार्चनंतर मुगुरूझाने डब्ल्यूटीए टूरवरील ही दुसरी स्पर्धा जिंकली आहे. गेल्या मार्चमध्ये मुगुरूझाने दुबईतील स्पर्धा जिंकली होती. 2016 साली मुगुरूझाने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम तर 2017 साली विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपद मिळविले होते. पुढील महिन्यात मेक्सिकोमध्ये होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील आठ खेळाडूंच्या फायनल स्पर्धेसाठी मुगुरूझाला आठवे तर जेबॉरला नववे मानांकन मिळाले आहे. 2017 नंतर मुगुरूझाने डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत सहभाग दर्शविलेला नाही.