वृत्तसंस्था/ दुबई
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने तसेच बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सने एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
गेल्याच आठवडय़ात झालेल्या डोहा खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱया मुगुरुझाने गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तृतीय मानांकित साबालेन्काचा 3-6, 6-3, 6-2 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. बेल्जियमच्या दहाव्या मानांकित मर्टेन्सने जेसिका पेगुलावर 5-7, 7-5, 6-0 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. मुगुरुझा आणि मर्टेन्स यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. अन्य एका सामन्यात बार्बोरा क्रेसिकोव्हाने रशियाच्या पोटापोव्हावग 6-0, 6-2 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली.