वृत्तसंस्था /शेनझेन :
डब्ल्यूटीए टूरवरील येथे नव्या वर्षांतील पहिल्या शेनझेन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या गार्बेनी मुगुरूझाने एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे रशियाच्या ऍलेक्सड्रोव्हाने शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले आहे.
गुरूवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुगूरूझाने कझाकस्थानच्या झरिना दियासचा 6-4, 2-6, 6-4 असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात रशियाच्या ऍलेक्सड्रोव्हाने चीनच्या क्यूयाँगचा 3-6, 6-4, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मुगुरूझा आणि ऍलेक्झांड्रोव्हा यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.