वृत्तसंस्था/ बार्सिलोना
यावर्षी स्पेनमध्ये होणारी स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्यात आली असल्याचे विश्व बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) शुक्रवारी जाहीर केले.
ही स्पर्धा 1 ते 6 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ‘या वर्षीच्या नवव्या आठवडय़ात ही स्पर्धा आयोजित करण्यास स्पेन बॅडमिंटन फेडरेशनने असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमधील अन्य स्पर्धा ठरल्याप्रमाणे होतील,’ असे बीडब्ल्यूएफने निवेदनाद्वारे सांगितले. कोरोनाचा धोका कायम असला तरी स्पर्धा आयोजकांच्या मदतीने सर्व स्पर्धांचे आयोजन ठरल्याप्रमाणे केले जाईल, असेही त्यांनी त्यात म्हटले आहे.