जानेवारीतील आकडेवारी सादर : सेल्टॉस दुसऱया तर वेन्यू तिसऱया स्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या जानेवारीतील कार विक्रीचे आकडे विविध कंपन्यांनी नुकतेच जाहीर केले आहेत. या अंतर्गत पाहता स्पोर्टस् युटिलीटी (सुव्ह) गटामध्ये कार खरेदी करण्यामध्ये ग्राहकांचा कल अधिक दिसून आला आहे.
जानेवारीमध्ये सुव्ह गटाचा विचार करता टाटाच्या नेक्सॉनने विक्रीत आघाडी घेतली आहे. जानेवारी 2022 मध्ये 13 हजार 816 नेक्सॉन गाडय़ांची विक्री झाली आहे. यापाठोपाठ दुसऱया नंबरवर असणाऱया किया सेल्टॉसच्या 11 हजार 483 गाडय़ा विक्री झाल्या आहेत तर 11 हजार 377 वाहनांची विक्री करत हय़ुंडाई वेन्यू तिसऱया क्रमांकावर राहिली आहे. या पाठोपाठ 10 हजार 027 वाहनांच्या विक्रीसह टाटाची पंच ही गाडी राहिली आहे. नेक्सॉनच्या वाहन विक्रीमध्ये जानेवारी 2021 च्या तुलनेमध्ये गेल्या जानेवारीत 67 टक्के इतकी लक्षणीय वाढ दिसली आहे. जानेवारी 2021 मध्ये 8 हजार 225 इतक्मया नेक्सॉन गाडय़ा विकल्या गेल्या आहेत. सेल्टॉसने जानेवारी 2021 मध्ये 9 हजार 869 वाहनांची विक्री केली होती, ज्याच्या तुलनेमध्ये जानेवारी 2022 मध्ये विक्रीत 16 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. हय़ुंडाई वेन्यूच्या 11 हजार 799 गाडय़ा जानेवारी 2021 मध्ये विक्री करण्यात आल्या होत्या. या तुलनेमध्ये 2022 मध्ये जानेवारी महिन्यात विक्रीत 3 टक्के घट दिसली आहे. अलीकडेच भारतीय बाजारात उतरलेल्या टाटा पंच या गाडीने मात्र ग्राहकांमध्ये चांगलीच लोकप्रियता प्राप्त केली आहे.