क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
स्पोर्ट्स क्लब हुबळी येथे ज्येष्ठांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या एमएसडीएफ संघाने स्पोर्टिंग फुटबॉल चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. हुबळी येथे 35 वर्षावरील वयोगट फुटबॉल स्पर्धेत एकूण 5 संघांनी भाग घेतला होता. या संघामध्ये साखळी सामने खेळविण्यात आले होते.
पहिल्या सामन्यात एमएसडीएफ संघाने स्पोर्टिंग हुबळी संघाचा 4-2 असा पराभव केला. कुलदीप राणा, प्रवीण देसाई, वैजनाथ राणा, नारायण अष्टेकर यांनी गोल केले.
दुसऱया सामन्यात तिरंगा फुटबॉल क्लबने 1-1 असे बरोबरीत रोखले. एमएसडीएफतर्फे कुलदीप राणाने गोल केला. तिसऱया सामन्यात एमएसडीएफला जिदान एफसी संघाने शून्य बरोबरीत रोखले. चौथ्या शेवटच्या साखळी सामन्यात एमएसडीएफ संघाने रेल्वे संघाचा 1-0 असा पराभव केला. प्रवीण देसाईने गोल केला.
अंतिम सामना एमएसडीएफ वि. रेल्वे यांच्यात झाला. या सामन्यात 2-0 अशा गोलफरकाने विजय संपादन केले. एमएसडीएफ तर्फे जियाउद्दीन बेपारी व प्रवीण देसाई यानी गोल केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चषक रोख रक्कम व पदके देऊन गौरविण्यात
आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा मान कुलदीप राणा, उत्कृष्ट गोलरक्षक कपिल वाळवेकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या विजयी संघात नारायण अष्टेकर, कुलदीप राणा, प्रवीण देसाई, अशोक पाटील, आश्पाक पटेल, सुशील शिंदे, विजय राना, कपिल वाळवेकर व जियाउद्दीन बेपारी यांचा समावेश राहिला.