सिक्स-पॅक abs जमान्यातील ‘फिटनेस ट्रेंड-सेटर’ किंग कोहली!
1020 दिवस, 84 डाव, असंख्य प्रकारची टीका, तिन्ही क्रिकेट प्रकारातून नेतृत्वावरुन गच्छंती…. कित्येक आघात सोसत आलेल्या विराट कोहलीने अखेर मागील आठवडय़ात आशिया चषकातील शेवटच्या सुपर-4 सामन्यात अफगाणविरुद्ध शानदार शतक झळकावले आणि येथेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा शतकाचा दुष्काळ एका झटक्यात संपुष्टात आला. आशिया चषक स्पर्धेच्या प्रारंभी विराटचा फॉर्म हा चिंतेचा विषय होता. पण, भारताच्या दृष्टीने ही स्पर्धा संपता संपता विराटला सूर सापडला आणि त्याने 71 व्या शतकाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणत आपला फिटनेस, आपला चार्म, आपले गतवैभव, सारे साम्राज्य पुन्हा एकदा खणखणीत नाण्यासारखे वाजवण्यासाठी आपण सुसज्ज असल्याचा दाखला दिला. आगामी वर्ल्डकप जिंकून देण्याची महत्त्वाकांक्षा असणारा हा सिक्स-पॅक ऍपमधील खेळाडू आपला आहार, आपले वर्कआऊट, यावर कसा भर देतो, हे जाणून घेणे म्हणूनच रंजक ठरते.
71 वे शतक झळकावल्यानंतर त्याने आपले शालेय स्तरावरील एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आणि त्याखाली लिहिले,
खाओ, पियो, ऐश करो मित्रो! दिल पर किसे दा दुखायो ना!
तो भारतीय क्रिकेटमधील फिटनेस ट्रेंडसेटर! तो आधुनिक क्रिकेटमधील महानतम फलंदाज! तो गोलंदाजांचा कर्दनकाळ! तो वर्कआऊटच्या दुनियेतीलही अवलिया! वर्कआऊट करावा, तो विराटने, प्रतिस्पर्ध्यांवर वचक ठेवावा तो विराटने आणि महान फलंदाजांची यादी करायची तर त्यातही अव्वलस्थानी रहावे ते विराटनेच!
भले 3 वर्षातील विराटच्या शतकातील दुष्काळाने त्याचे वलय कमी केले असेल. टायमिंग, फुटवर्कमध्ये तो झगडला असेल.पण, त्याची धावांची भूक, त्याची सातत्य कायम राखण्याची जिद्द आणि त्याची खेळाप्रती तळमळ, बांधिलकी मात्र तसूभरही कमी झालेली नाही.
दुबईतील रणरणत्या उन्हात त्या दिवशी 71 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावल्यानंतर विराटच्या चेहऱयावर पसरलेले स्मित हास्य खूप काही सांगून जात होते. त्याचे ते हास्यच दडपण कसे निघून गेले आहे, हे सांगत होते. वास्तविक, तीन वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, विराटने कसेही फटके मारले तरी ते सीमापार जात असत. पण, परिस्थिती अचानक बदलली आणि त्याचा धावांचा वेग आटला. यालाच कदाचित फॉर्म आणि वेळ म्हणतात.
अगदी अलीकडेच त्याने पूर्ण भरलेल्या ड्रेसिंगरुममध्येही आपण ‘एकटे’ कसे असतो, हे वर्णले होते. काही अधिक न सांगताच तो त्यावेळी खूप काही सांगून गेला होता. वास्तविक, 2014 मध्येही विराटला अशा खराब फॉर्मचा सामना करावा लागला होता. पण, यावेळी मनोधैर्याचा प्रश्न होता. काही वेळा तर बाद झाल्यानंतर तो स्वतः हसत बाहेर गेला. आपल्याकडून अशी चूक झाली, त्यावर त्याचाच विश्वास बसत नव्हता. 70 व्या शतकानंतर इतकी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागणे आपल्यासाठी आश्चर्याचे होते, असे विराट त्यावेळी आवर्जून म्हणायचा.
‘अगदी 60 च्या घरात पोहोचल्यानंतर देखील, जम बसलेला असतानाही अचानक बाद व्हावे लागायचे आणि मी स्वतःच त्यावेळी थक्क व्हायचो’, याचा त्याने उल्लेख केला. पण, एकदा 71 वे शतक झळकावले आणि त्याचवेळी तो ऑस्ट्रेलियन महान फलंदाज रिकी पाँटिंगच्या 71 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यात यशस्वी ठरला.
विराट आता आपल्या ‘ऑरा’मध्ये पोहोचला आहे. काहीच दिवसात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची छोटी मालिका खेळेल आणि त्यानंतर लगोलग दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मर्यादित षटकांची मालिका खेळेल. त्यानंतर असेल ते ऑस्ट्रेलियातील वर्ल्डकपचे आव्हान! या साऱयासाठी विराटचे बहरात परतणे महत्त्वाचे होते. त्यातील 71 व्या शतकाचा अडसर विराटने अखेर दूर सारला. आता आगामी कालावधीत विराटचे वर्ल्डकप जिंकण्याचे मुख्य लक्ष्य असेल आणि यासाठी तो आपला सारा अनुभव, आपले सर्वस्व पणाला लावत नसेल तरच आश्चर्य!
जम बसला तर प्रतिस्पर्ध्यांना ‘ने चान्स’!
तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरणे पसंत असणारा विराट कोहली चेंडूवर नजर स्थिरावेतोवर संयमी पवित्र्यावर भर देतो. मात्र, एकदा जम बसल्यानंतर क्रिकेटचा चेंडू त्याला जणू फुटबॉलप्रमाणे दिसू लागतो आणि त्यानंतर त्याची फटकेबाजी एकदा सुरु झाली की, प्रतिस्पर्ध्यांनाही काहीच चान्स बाकी राहत नाही.
विराटने मागील 2 वर्षात खेळलेल्या टी-20 सामन्यात विविध षटकांदरम्यान कशा धावा जमवल्या आहेत, त्याचा हा लेखाजोखा…
- षटके / धावा / सरासरी / स्ट्राईक रेट
- 1 ते 6 / 167 / 83.05 / 123.07
- 7 ते 15 / 236 / 33.71 / 114.01
- 16 ते 20 / 146 / 48.67 / 197.03
विराट कोहलीची वर्षनिहाय शतके
- वर्ष / शतके
- 2008 : 0
- 2009 : 1
- 2010 : 3
- 2011 : 4
- 2012 : 8
- 2013 : 6
- 2014 : 8
- 2015 : 4
- 2016 : 7
- 2017 : 11
- 2018 : 11
- 2019 : 7
- 2020 : 0
- 2021 : 0
- 2022 : 1
जेव्हा विराट म्हणाला, मी व्हिगन आहे, असा दावा कधीही केलेला नाही!
विराट कोहली अद्याप मांसाहारी आहे की खरोखरच तो पूर्ण शाकाहाराकडे वळला आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमी उत्सुकता राहिली आहे. मध्यंतरी विराटने आपण व्हिगन डाएटकडे वळत असल्याचे म्हटले होते. मात्र, यावरुन जे चर्चांचे मोहोळ उठले, याला विराटने काही कालावधीपूर्वी पूर्णविराम दिला. ‘मी व्हिगन आहे, असा दावा कधीच केला नव्हता. आजही व्हीगनपेक्षा माझा कल व्हेजेटेरियनकडे अधिक असतो’, असे तो त्यावेळी म्हणाला होता.
व्हेजेटेरियन व व्हीगन यांच्यात नेमका फरक काय?
मांस, पोल्ट्री, मासे याचा समावेश असत नाही, तो आहार घेणारी व्यक्ती म्हणजे व्हेजेटेरियन. व्हीगन मात्र त्यापेक्षाही अधिक कडक नियम पाळतात. ते दूध, अंडी आणि प्राणीजन्य आहार टाळतात. दूध प्राणीजन्य असल्याने ते दुधाबरोबरच ताक, दही, तूप असे अन्य दुग्धजन्य पदार्थही टाळतात. प्राणीजन्य दुधाऐवजी असे लोक सोया दुधाचा पर्याय अवलंबतात. विशेषतः युरोपियन देशात याबाबत अधिक जनजागृती झाली आहे आणि अर्थातच, भारतापेक्षाही बाहेरील देशात व्हीगन्सची संख्या अधिक आहे.
असा असतो विराटचा डाएट
आपल्या अफलातून तंदुरुस्तीसाठी ओळखला जाणारा 32 वर्षीय विराट आपल्या आहाराबाबत देखील तितकाच चोखंदळ आहे. प्रोटिनच्या पूर्ततेसाठी क्विनोआ, स्पिनॅच, अंडी, दाल, प्रोटिन बारवर त्याचा भर असतो. हिरव्या पालेभाज्यांचा त्याच्या त्याच्या आहारात निश्चितपणाने समावेश असतो. विराटचे कॉफीप्रेम बऱयापैकी सर्वश्रुत आहे. दिवसातून दोनवेळा कॉफी घेत असला तरी विराट रिफाईन शूगर व शुगरी ड्रिंक्सपासून दूर राहतो. प्रोटिन शेक, स्मुथीज, स्प्राऊट्स, मिक्स सॅलड त्याच्या पसंती क्रमात असतात. डोसा, चायनीज फूड, मश्रूम डम्पलिंग्ज, डीम सम्स याचाही तो योग्य प्रमाणात समावेश करतो.
ब्रेकफास्ट : थ्री एग्ज व्हॉईट आम्लेट वुईथ पेनॉट बटर ऑन ब्राऊन ब्रेड, ग्रील चिकन, चीज, ग्रिल्ड बॅकॉन, स्मोकड सॅलमन, मॅश पोटॅटो,
लंच : चिकन, स्पिनॅच
डिनर : सूप, सॅलड, स्टीर-फ्राईड व्हेजेटेबल्स, सी फूड,
कधी काळी बटर चिकन, डेझर्ट्स, छोले भटुरे वीक पॉईंट होते. पण, फिटनेससाठी सारे सोडले!
अवघ्या देशभरात दिल्ली छोले भटुरेसाठी लौकिकप्राप्त आहे. हेच छोले भटुरे विराट कोहलीसाठी वीक पॉईंट होते. केवळ छोले भटुरेच नव्हे तर बटर चिकन, डेझर्ट्स हे देखील विराटच्या हॅव-टू-लिस्टमध्ये असायचे. पण, क्रिकेटमधील कारकीर्द घडत असताना विराटला फिटनेस राखण्याची गरज भासू लागली आणि त्याला आपल्या आहारातून छोले भटुरे, बटर चिकन, डेझर्ट्स या सर्वांची सुट्टी करावी लागली.
आठवडय़ातून किमान पाच ते सहा दिवसांचा वर्कआऊट, एक दिवस विश्रांती
विराट कोहली आपल्या तंदुरुस्तीवर प्रचंड मेहनत घेतो. आठवडय़ातून पाच ते सहा दिवस तो वर्कआऊट अजिबात चुकवत नाही. वेट व कार्डिओ एक्सरसाईजेसचे पॉवरफुल कॉम्बिनेशन असेल, यावर तो भर देतो. स्ट्राँग मसल्स, सुपर बॉडी स्ट्रेंथ, स्टॅमिना हे सारे काही त्याला या कठोर मेहनतीमुळेच शक्य झाले आहे. विराट या वर्कआऊटमधून आठवडय़ातून केवळ एखाद-दुसरा दिवस विश्रांती घेतो. दौऱयावर असताना देखील तो आपल्या वर्कआऊटमध्ये कोणतीही कसर सोडत नाही.
होम-फुड हा सर्वोच्च प्राधान्यक्रम
विराटचा होम-फुडवर सर्वाधिक भर राहत आला आहे. मात्र, तरीही तो यातही शूगर कन्झम्शन कमी राहील, याबाबत दक्ष असतो. सुपर डीसिप्लीन, होम फुडवर भर देत असताना तो दिवसातून 3 ते 4 वेळा लिंब पिळलेले ग्रीन टी घेतो. यामुळे टॉक्सिन बाहेर फेकत मेटाबॉलिजम सुपरचार्ज ठेवणे त्याला शक्य होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
- फलंदाज / देश / शतक / डाव
- सचिन तेंडुलकर / भारत / 100 / 782
- विराट कोहली / भारत / 71 / 522
- रिकी पाँटिंग / ऑस्ट्रेलिया / 71 / 668
- कुमार संगकारा / श्रीलंका / 63 / 666
- जॅक कॅलिस / द. आफ्रिका / 62 / 617
टी-20 मध्ये भारतातर्फे डावात सर्वाधिक धावा
- फलंदाज / धावा / प्रतिस्पर्धी / ठिकाण / वर्ष
- विराट कोहली / 122ना. / अफगाण / दुबई / 2022
- रोहित शर्मा / 118 / श्रीलंका / इंदोर / 2017
- सूर्यकुमार यादव / 117 / इंग्लंड / नॉटिंगहम / 2022
- रोहित शर्मा / 111ना. / विंडीज / लखनौ / 2018
- केएल राहुल / 110ना. / विंडीज / लॉडरहिल / 2016
कर्नाटकातील दुसरी टर्फ विकेट बेळगावात आणणारे अविनाश पोतदार
आयुष्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आव्हान असतो, असे मानणारे आणि त्या आव्हानालाच संधी समजून त्या संधीचे सोने करणारे अवलिये खूपच कमी असतात आणि त्यापैकीच बेळगावातील क्रीडाप्रेमी, दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे अविनाश पोतदार! मागील कित्येक दशके त्यांनी बेळगावातील क्रीडा क्षेत्राकरिता सातत्याने उत्तुंग योगदान दिले. कर्नाटकातील दुसरी टर्फ विकेट बेंगळूरनंतर बेळगावात आणण्यात, ऑटोनगरमध्ये भव्यदिव्य स्टेडियम उभे करण्यात आणि बेळगावातील मैदानांवर सुनील गावसकरांपासून जसप्रित बुमराहपर्यंत अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची तजवीज करणारे अविनाश पोतदार खऱया अर्थाने बेळगाव स्पोर्ट्सचे कोहिनूर ठरावेत.
तो सुवर्णदिवस होता 22 ऑगस्ट 2006. ऑटोनगर येथे 16 एकरच्या आसपास विस्तीर्ण जागेत केएससीए स्टेडियम उभे करण्यासाठी रितसर मंजुरीचे पत्र आले आणि त्यानंतर अवघ्या 10 वर्षांच्या कालावधीत केएससीए धारवाड झोनचे समन्वयक अविनाश पोतदार यांनी त्यांचे प्रदीर्घकालीन सहकारी दीपक पवार यांच्यासह हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यासाठी अविरत मेहनत घेतली. त्यापूर्वी, तीन दशकांपूर्वी युनियन जिमखाना येथे टर्फ विकेट आणण्यात अविनाश पोतदार यांचा वाटा मोलाचा राहिला. बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या जडणघडणीत त्यांना दीपक पवार, अनंत देशपांडे, सुनील देसूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
युनियन जिमखाना येथे टर्फ विकेट तयार करण्याबरोबरच त्याच्या उद्घाटनासाठी माजी कर्णधार सुनील गावसकर येतील, याची त्यांनी तजवीज केली. 1983 मध्ये विश्वचषक जिंकणाऱया भारतीय संघातील जवळपास सर्व खेळाडू जिमखान्याच्या टर्फ विकेटवर खेळले आहेत, हे आणखी एक विशेष.
1999 मधील आंध्र-कर्नाटक रणजी सामना असेल किंवा त्यानंतर भारत अ-श्रीलंका अ सामना, बांगलादेश अ-भारत अ महिला गट सामना, पंजाब-गुजरात रणजी, गुजरात-तामिळनाडू रणजी, मुंबई-कर्नाटक रणजी लढत, या सर्व सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्याचे शिवधनुष्य त्यांनी सहजपणे पेलले. अगदी अलीकडेच हुबळीत भारत अ-न्यूझीलंड अ यांच्यातही कसोटी सामना संपन्न झाला. या सर्व माध्यमातून सूर्यकुमार यादव, जसप्रित बुमराह, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, आदित्य तरे, प्रियांक पांचाळ असे अनेक खेळाडू बेळगावात खेळले.
याशिवाय, विविध वयोगटातील स्पर्धा, विविध प्रशिक्षण शिबिरे यशस्वीरित्या भरवले गेले. गदग येथे पहिल्या टप्प्यात 75 लाख रुपयांच्या निधीतून 13 एकर जागेची खरेदी केली गेली असून तेथेही 2 कोटी 33 लाख रुपये खर्चातून नवे स्टेडियम उभे केले जात आहे.
बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त यादीत समावेश
सध्या बेळगावातील ‘ग्राऊंड प्लेईंग एरिया’चा बीसीसीआय मान्यताप्राप्त यादीत समावेश असून 28 खोल्या, स्विमिंग पूलची उभारणी झाली आहे. गॅलरी व फ्लडलाईट्स शक्य तितक्या लवकर उभे करणे हे आपले पुढील लक्ष्य असल्याचे अविनाश पोतदार याप्रसंगी आवर्जून सांगतात.
दीपक चौगुले, रोनित मोरे, रोहन कदम, स्वप्नील येळवे, सुजय सातेरी विविध स्तरावर खेळत आले असून, विविध भूमिका बजावत आले असून राष्ट्रीय संघातून बेळगावचे खेळाडू चमकावेत, यासाठी अविनाश पोतदार यांचे प्रयत्न आहेत.
खेळाडूंनी परफॉर्मन्स दिला तरच उज्ज्वल भविष्य!
क्रिकेट केवळ 40 वर्षांपर्यंत. तेथे निवृत्त होणे भाग असते. त्यामुळे, खेळाडूंनी खेळाबरोबरच शिक्षणाकडेही तितकेच लक्ष द्यावे आणि त्याचबरोबर पालकांनी खेळाडूंना कार्यकारिणीपर्यंत आणण्याऐवजी कामगिरीच्या माध्यमातून खेळाडूंनी संघनिवडीचे दरवाजे ठोठावणे अधिक रास्त ठरेल, इतकी अपेक्षा ते याप्रसंगी व्यक्त करतात.
खेळ जुनाच, ओळख नवी!
थाळीफेक
थाळी
महिलांकरिता
- 12 मिलिमीटर मेटल एज
- 18 सेंटीमीटर डाएमीटर, वजन 1 किलोग्रॅम
पुरुषांकरिता
- 12 मिलिमीटर मेटल एज
- 22 सेंटीमीटर डाएमीटर,
- वजन 2 किलोग्रॅम
थाळी लँडिंग सेक्टर
थ्रोईंग सर्कल डाएमीटर
40 अंश
थ्रोईंग सर्कल
डाएमीटर 2.5 मीटर
मेटल रिम डेप्थ : 8 सेंटीमीटर
प्रिपेरेशन
एन्ट्री
एअरबोन
ट्रान्झिशन
डीलिव्हरी