ऑनलाईन टीम / लखनऊ :
स्फोटकांच्या साठ्यासह अलकायद्याच्या दोन दहशतवाद्यांना एटीएसने लखनऊमध्ये अटक केली आहे.
लखनऊच्या दुबग्गा भागातील सीतेबिहार कॉलनीत संशयित दहशतवादी लपून बसल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम राबविण्यात आली. एका घरात लपलेल्या शाहिद उर्फ गुड्डू वसीम या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्या घरातून दोन प्रेशर कुकर बॉम्ब आणि अर्धनिर्मित टाइम बॉम्ब जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार याच परिसरात लपला होता. त्यालाही एटीएसकडून अटक करण्यात आली. त्याचे नाव अद्याप समोर आले नाही. हे दहशतवादी येत्या 2 ते 3 दिवसात मोठी दुर्घटना घडवण्याच्या तयारीत होते.