प्रतिनिधी बेळगाव
स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्षपूर्ती निमित्त येथील शौर्य चौक मधील गांधी स्मारकाची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीम 25 कर्नाटक बटालियन एनसीसी, 26 कर्नाटक बटालियन एनसीसी आणि 8एअर स्क्वाड्रन बेळगाव एनसीसी मधील विद्यार्थ्यांकडून आयोजित करण्यात आली होती. ही मोहीम कर्नल के श्रीनिवास ग्रुप कमांडर एनसीसी बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, यावेळी सर्व एनसीसी विद्यार्थ्यांनी कोरोना नियमावलीचे पालन करून या मोहिमेत भाग घेतला होता.
या मोहिमेदरम्यान ग्रुप कमांडर एनसीसी बेळगावच्या वतीने स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच वेगवेगळय़ा ऑनलाइन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर स्पर्धेत भाग घेतलेल्या एनसीसी विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. याप्रसंगी ग्रुप कमांडर ऑफिसर, ग्रुप कमांडिंग ऑफिसर, 25 कर्नाटक एनसीसी बटालियनचे कर्नल अभय अवस्थी, ऍडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल राजीव साहनी, पीआय स्टाफ, आणि 25, 26 कर्नाटक बटालियन अधिकारी उपस्थित होते