कंत्राटदाराकडून 60 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळय़ात
प्रतिनिधी / बेळगाव
कंत्राटदाराकडून 60 हजार रुपये लाच स्वीकारताना स्मार्टसिटीचा अधिकारी एसीबीच्या जाळय़ात अडकला असून या अधिकाऱयाच्या घरात 23 लाख 56 हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
स्मार्टसिटी कार्यालयातील जनरल मॅनेजर (टेक्नीकल) सिद्धनायक दोडबसाप्पा नायकर याला अटक करण्यात आली आहे. एसीबीचे पोलीस अधिक्षक बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक जे. एम. करुणाकरशेट्टी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, एच. सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. संजीवकुमार नवलगुंद (रा. गणेशनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. संजीवकुमार हे अपूर्वा कंस्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. स्मार्टसिटी योजनेंतर्गत त्यांनी बस थांब्यांची उभारणी केली आहे. त्याची बिले मंजूर करण्यासाठी सिद्धनायक यांनी 60 हजारांची लाच मागितली होती. त्यामुळे संजीवकुमार यांनी एसीबीकडे धाव घेतली होती. गुरुवारी आपल्या घरात 60 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱयांनी सिद्धनायकला रंगेहात पकडले आहे. या कारवाईनंतर घरात तपासणी केली असता 23 लाख 56 हजार रुपये रोख रक्कम मिळाली आहे. सिद्धनायक हा मुख्य अभियंता दर्जाचा अधिकारी आहे.