महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र बसथांब्यांच्या देखभालीअभावी बसथांब्यांवर कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्मार्ट सिटी बसथांब्यांची देखभाल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा काढण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे निविदा काढण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे बसथांब्यांच्या देखभालीकडे स्मार्ट सिटीसह महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले असून, काही ठिकाणी बसथांब्यांचे काम अर्धवट झाले आहे. काही बसथांब्यांचे काम पूर्ण झाले असून, ई टॉयलेट, कॅफेटोरिया आणि डिजिटल फलक, बसच्या वेळापत्रकाचा फलक, आसन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. सदर बसथांब्यांचे हस्तांतर महापालिकेकडे करण्यात आल्याचे स्मार्ट सिटी कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच बसथांब्यांच्या देखभालीसाठी महापालिकेच्या महसूल विभागाने निविदा मागविण्याची तयारी चालविली होती. पण कोरोनाच्या प्रसारामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. याबाबत महापालिका कार्यालयातील महसूल विभागाकडे चौकशी केली असता, निविदा प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही.
अस्वच्छता-कचऱयाचे साम्राज्य कोटय़वधी निधी खर्चून स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले. पण देखभाल करण्यात येत असल्याने अस्वच्छता आणि परिसरात कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच नळजोडणी करण्यात आली नसल्याने इ टॉयलेट बंद आहेत. सध्या बसथांब्यांवर बसच्या वेळापत्रकाचा डिजिटल फलक सुरू करण्यात आला आहे. पण काही मोजक्मयाच बसथांब्यांवरील फलक सुरू आहेत. तसेच काही बसथांब्यांवर भटक्मया जनावरांनी आणि बेघर नागरिकांनी आसरा घेतला आहे. त्यामुळे बसथांब्यांवर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा त्रास प्रवाशांना होत आहे. याबाबत तक्रार केली असता सदर बसथांब्यांची देखभाल महापालिकेच्यावतीने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप कोणतीच प्रक्रिया राबविण्यात आली नाही. 34 बसथांब्यांच्या देखभालीसाठी महापालिकेने निविदा मागविण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र त्यानंतर पुढील प्रक्रिया झालीच नाही. परिणामी देखभालीची निविदा मागविण्याचा प्रस्ताव मागील 8 महिन्यांपासून रखडला आहे. देखभालीची निविदा काढण्यासाठी महापालिकेला कधी मुहूर्त