बेळगाव /प्रतिनिधी
स्मार्ट सिटीच्या कामात दिरंगाई करण्यात येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मध्यवर्ती बसस्थानक येथील रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने व्हाईट टॉपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक दुसऱया मार्गाने वळविण्यात आली असल्यामुळे वाहनधारकांचे व पादचाऱयांचे हाल होत आहेत.
मार्केट पोलीस स्टेशनच्या समोर केबल वाहिनी घालण्याकरिता खोदाई करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हे काम करण्यात येत आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणाऱया प्रवाशांना अडचणीचे बनले आहे. येथील रस्ता बंद करण्यात आल्यामुळे वाहनधारकांना मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाण्यासाठी दुसऱया मार्गावरून जावे लागत आहे.
येथील खोदाई करण्यात आलेल्या रस्त्यावर केबल वाहिनी घालण्यात येत असल्यामुळे येथील वाहतुकीवर ताण पडत असून वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील स्मार्ट सिटीचे काम संथगतीने होत असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून करण्यात येत आहे.