प्रतिनिधी/ बेळगाव
कॅटोन्मेंट परिसरात राबविण्यात येणाऱया स्मार्ट सिटी योजनेतील विकास कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदर कामे पूर्ण करण्यासाठी कॅटोन्मेंट बोर्ड कडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केला. यामुळे कॅटोन्मेंट बोर्डच्या बैठकीत लोकनियुक्त सदस्य आणि खासदार-आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले.
कॅटोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण बैठक ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यावेळी स्मार्ट सिटी योजनेतील विकास कामाच्या मुद्यावर चर्चा झाली. स्मार्ट सिटी योजनेमधून खानापूर रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र या रस्त्यावर येणारी अतिक्रमणे, कॅटोन्मेंट ऑफिसची संरक्षक भिंत आणि ऑक्ट्राय नाक्मयाची इमारत हटविण्यात आली नाही. हे अडथळे हटविण्याची सूचना कॅटोन्मेंट बोर्डाला करण्यात आली होती पण कॅटोन्मेंट बोर्डने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे रेल्वे राज्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चेवेळी कॅटोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सदस्यांवर आरोप केला. नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने अतिक्रमने हटविण्यात आली नाहीत. नुकसान भरपाई देण्याकरिता कॅटोन्मेंट बोर्ड कडे निधी नाही, नुकसानभरपाई दिल्यास अतिक्रमणे हटविण्यात येतील असे सांगण्यात आले.
रेल्वे स्टेशनच्या विकासात अडथळा असलेले गाळे, इमारती हटविण्याची सूचना यावेळी केली. तसेच रेल्वे स्टेशनच्या विकासासह कॅटोन्मेंट हद्दीतील विकास राबविण्यासाठी सहकार्य करण्याची सूचना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केली. किल्ला येथील भाजी मार्केट स्थलांतर करण्यात आले आहे, तरीदेखील काही व्यापारी त्याठिकाणी व्यवसाय करीत आहे. रात्रीच्या वेळी या गाळय़ांचा दुरुपयोग होत आहे. त्यामुळे आवश्यक कारवाई करावी अशी सूचना करण्यात आली. कॅटोन्मेंट हद्दीतील कत्तलखाना स्थलांतर करण्यात येणार असताना त्याठिकाणी सांडपाणी प्रकल्प राबवण्यासाठी निधी खर्च करण्याची गरज काय ? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सदर कत्तलखाना स्थलांतरासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून नवीन जागा मंजूर करून घ्यावी अशी सूचना मंत्री सुरेश अंगडी यांनी केली. याकरिता आपण पाठपुरावा करू असे आश्वासन देखील बैठकीत दिले. यावेळी बैठकीत विविध विकास कामाच्या द्यावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
बैठकीला आमदार अनिल बेनके, कॅटोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वर्चस्व, उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर, सदस्य डॉ. मदन डोंगरे, अलेदिन किल्लेदार, रिजवान बेपारी, साजिद शेख, कॅटोन्मेंट बोर्डचे अभियंते सतीश मण्णूरकर, कार्यालय अधीक्षक एम. वाय. ताळूकर आदींसह सरकार नियुक्त सदस्य, मिलीटरी अधिकारी उपस्थित होते.