प्रतिनिधी / पणजी
रायबंदर येथील जुने आरोग्य केंद्र जे सध्या बंद स्थितीत आहे याला शुक्रवारी महापौर उदय मडकईकर यांनी आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. जोस डिसा यांच्यासोबत भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार बाबुश मोन्सेरात यांची ओएसडी निधा, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
रायबंदर येथील हे हॉस्पिटल अनेक वर्षापासून बंद होते ते हॉस्पिटल आता स्मार्ट सिटी खाली परत अस्तित्वात आणण्याचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी महानगरपालिकेच्या सहाय्याने ठरविले आहे. नव्याने या हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे. असे महापौर उदय मडकईकर यांनी यावेळी सांगितले. स्थानिक लोकांना जवळपास हेल्थ सेंटर नसल्याने सदर हॉस्पिटल पुन्हा उभारण्यावर देण्यात येत आहे. यामध्ये आधुनिक सेवा देण्याचा महानगरपालिकेचा भर असून. यामध्ये ओपीडी, फार्मासी व इतर सेवा देण्यात येणार आहे. सध्या या जुन्या आरोग्य केंदाची पाहणी करण्यात आली असून काही दिवसांतच याबाबत चित्र स्पष्ट होईल. असे मडकईकर यांनी पुढे सांगितले.