मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल होत आहे. यात एक हिमाच्छादित प्रदेशात एका निद्रिस्त महिलेसाठी आकृती दिसून येत. या आकृतीला ‘द स्लीपिंग लेडी’ म्हटले जात आहे. हा पर्वत अलास्काच्या एंकरेजमध्ये असल्याचा दावाही केला जात आहे.
द स्लीपिंग लेडी पर्वताला अलास्कामध्ये माउ&ट सुसिटना असे म्हटले जाते. हा पर्वत सुमारे 4390 फूट उंचीचा आहे. याच्या पश्चिम काठावर सुसिटना नदी आहे. या पर्वताला दूरून पाहिल्यास एखादी महिला झोपी गेल्याचा भास होतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे छायाचित्र प्रत्यत्रात डिजिटल आर्ट आहे. जीन मायकल बिहोरेल यांनी ते तयार केले आहे.
जगात द स्लीपिंग लेडी किंवा त्याच्याशी साधर्म्य असणाऱया नावांचे एकूण 50 हून अधिक पर्वत आहेत. या पर्वतांना एका विशिष्ट कोनातून पाहिल्यास तेथे एखादी महिला किंवा सुंदर युवती झोपी गेल्याचे वाटू लागते. कुठे याल स्लीपिंग ब्युटी तर कुठे स्लीपिंग वुमन इत्यादी नावांनी ओळखले जाते.
द स्लीपिंग लेडी या नावाशी मिळतेजुळते तीन पर्वत अमेरिकेतच आहेत. याचबरोबर अल्जीरिया, कंबोडिया, चिली, चीनमध्ये दोन, ग्रीस, मार्टिनीक, मेक्सिको, नॉर्वे, पाकिस्तान, पेरू, फिलिपाईन्स, तैवान आणि थायलंडमध्ये दोन पर्वत आहेत. याचबरोबर जगात ब्रेस्ट शेप्ड पर्वत, मृत महिला (डेड वुमन) नावानेही पर्वत आणि शिखरे आहेत. पण त्यांच्याकडून कुठलीच कलाकृती तयार करण्यात आलेली नाही. अलास्काचा माउंट सुसिटना वर्षभर हिमाच्छादित असतो, या भागात 5 ते 7 मोठय़ा हिमनद्या आहेत. त्यांच्या अध्ययनासाठी जगभरातील वैज्ञानिक अलास्का येथे पोहोचतात. माउंट सुसिटनाचा काही हिस्सा मीसोजोइक काळ म्हणजेच 6.30 कोटी वर्षे ते 23 कोटी वर्षे जुना आहे. कारण यात ज्युरासिक काळात क्वार्टज मोनोजोनाइट मिळाले आहेत.