युक्रेनचे बळ वाढणार
स्लोवाकियाने युक्रेनला सोव्हियत काळातील एस-300 हवाई सुरक्षा प्रणाली प्रदान केल्याची माहिती पंतप्रधान एडुआर्ड हेगर यांनी दिली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंसकी यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी युरोपीय महासंघाच्या उच्चाधिकाऱयांसोबत राजधानी कीव्हचा दौरा करत असताना त्यांनी ही टिप्पणी केली होती.
झेलेंस्की यांनी अमेरिकेच्या खासदारांना संबोधित करताना विशेषकरून एस-300 प्रणालीचा उल्लेख करत हवाई सुरक्षा प्रणाली उपलब्ध करविण्याची मागणी केली होती. या प्रणालीद्वारे रशियाची लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांना रोखण्यास युक्रेनला मदत होणार आहे.
नाटोचे सदस्य देश बुल्गारिया, स्लोवाकाय आणि ग्रीसकडे एस-300 हवाई सुरक्षा प्रणाली उपलब्ध आहे. ही प्रणाली शेकडो किलोमीटर अंतरावरून क्षेपणास्त्रs डागून लढाऊ विमाने आणि क्रूज क्षेपणास्त्रs नष्ट करू शकते.
जंगलातील रस्त्यांचा वापर करा
याचदरम्यान रशियाला लागून असलेल्या सीमावर्ती क्षेत्रात स्थानिक रहिवाशांना जंगलातील रस्त्यांचा वापर करणे, रस्त्यांच्या कडेवरून चालण्याची सूचना सूमी क्षेत्राच्या गव्हर्नरांनी करत सैन्य उपकरणांच्या नजीक न जाण्याचे आवाहन केले आहे. रशियाच्या सैन्याने पेरलेले भूसुरुंग आणि अन्य दारूगोळय़ामुळे स्थानिक लोक अद्याप धोक्यात असल्याचे दमित्रो झीवित्स्की यांनी म्हटले आहे.
कमी कालावधीत क्षेत्रात बचाव पथक, भूसुरुंग निकामी करणाऱया तज्ञांचे काम झाल्यावर तसेच त्यांच्याकडून संबंधित भाग सुरक्षित असल्याचे सांगण्यात आल्यावरच लोकांनी तेथे जाण्याचे धाडस करावे असे गव्हर्नर झीवित्स्की यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या अनेक भागांमधून रशियाच्या सैन्याने माघार घेतली असली तरीही अनेक ठिकाणी भूसुरुंग पेरून ठेवले असल्याचे बोलले जात आहे. याचमुळे युक्रेनच्या सैन्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.