युरोपमधील स्लोव्हेनिया हा देश त्या खंडातील तसेच एकप्रकारे जगातीलही पहिला कोरोनामुक्त देश ठरला आहे. याच देशात युरोपातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला होता. चार दिवसांपूर्वी तेथील शेवटच्या रुग्णावर यशस्वी उपचार करून त्याला कोरोनामुक्त करण्यात आले. आता या देशात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याची घोषणा करण्यात आली आहे.
तरीही हा देश पुन्हा कोरोनाची लागण होऊ नये यासाठी दक्ष आहे. युरोपातील कोणत्याही देशाचा प्रवासी या देशात आल्यास त्याला किमान सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. तसेच युरोप सोडून इतर देशातील प्रवाशांना चौदा दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. स्लोव्हेनिया देशाची लोकसंख्या 20 लाख असून त्याच्या सीमा इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि क्रोएशिया या देशांना लागून आहेत. यापैकी इटलीत कोरोनाने हाहाकार माजविला आहे.