प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव बाजारगल्ली येथील स्वकुळ साळी समाजाच्यावतीने जीव्हेश्वर मंदिर येथे समाजातील गरीब नागरिकांसाठी धान्य वापट करण्यात आले. समाजातील काही व्यक्तींनी एकत्रित येवून गरीबांसाठी हा उपक्रम राबविला. यावेळी समाजाचे अध्यक्ष, सेपेटरी, ट्रस्ट कमिटी तसेच समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एकूण 165 जणांना धान्याचे वाटप करण्यात आले.