प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सीटीच्या नावाखाली अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. जुना गुडसशेड रोड गोडसे कॉलनी येथील गटार व रस्ते पेव्हर्सचे काम पूर्ण करण्यात आले. पण गटारीमधील घाण आणि मातीचे ढिगारे हटविण्यात आले नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. याबाबत तक्रारी वाढल्याने वन टच फैंडेशनच्या वतीने गटारीची स्वच्छता करण्यात आली.
गटारीवरील झाकणे घालण्यात आली नाहीत. रस्ता उंच, घरे खाली, अशी अवस्था गोडसे कॉलनीची झाली आहे. कंत्राटदाराने गटारींमधील दगड माती तशीच सोडली आहे. याकडे फिरकून देखील पाहिले नाही.
अशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. हे पाहुन तेथील नागरिक बादल बागी यांनी सामाजिक कार्यकर्ते, वन टच फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी लागलीच बाहेरुन कामगार बोलावून संपूर्ण कॉलनीतील गटारीमधील 7 ट्रक्टर कचरा, माती, दगड, भरून काढून टाकून स्वच्छ करण्यात आली. हे कार्य पाहून प्रधान, कुंटे, रायकर, पटेल ,पेढेवाला, खेमलापुरी, गोडसे, यांनी रोख रक्कम देऊन सहकार्य केले. गटारी स्वच्छ झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.