सफाई कामगार संघटना, समाज कल्याण खाते-महापालिकेच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
मॅन्युअल एक्सेंज्युअर अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार शहर आणि तालुक्मयात अशाप्रकारचे कामगार नसल्याची माहिती समोर आली आहे. पण प्रत्यक्षात खासगी संस्था व अन्य सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता कामगारांकरवी कामे करवून घेतली जातात, अशी तक्रार माजी नगरसेवक व अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला यांनी बैठकीत केली. तसेच स्वच्छता कामगारांसाठी कायमस्वरुपी घरे देण्यात यावीत, अशी मागणी केली.
स्वच्छता कर्मचाऱयांच्या समस्या आणि मॅन्युअल एक्सेंज्युअर अंतर्गत चर्चा करण्यासाठी सफाई कामगार संघटना, समाज कल्याण खाते आणि महापालिकेच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक शुक्रवारी महापालिका कार्यालयात पार पडली. यावेळी मॅन्युअल एक्सेंज्युअर अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. शहरात काम करणाऱया कामगारांची माहिती देण्यात आली. पण तालुक्मयामध्ये अशा प्रकारचे कामकाज करणारे कामगार नसल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे याला संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला यांनी आक्षेप घेतला.
शहर आणि तालुक्मयात सरकारी कार्यालयांमध्ये तसेच खासगी कार्यालयांमध्ये स्वच्छतागृहे व अन्य स्वच्छतेची कामे कामगारांकडूनच करवून घेतली जातात. त्यामुळे अशा कामगारांची माहिती घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी अद्यापही स्वच्छतेसाठी यंत्रोपकरणे वापरली जात नाहीत. त्यामुळे स्वच्छता कामगारांकरवी ही कामे करवून घेतली जातात, अशी माहिती वाघेला व संघटनेचे सेपेटरी विजय नरगट्टी यांनी दिली.
यावेळी नरसिंग दासनगार, विजय कोल्हापुरे, अरुणा साके आदींसह महापालिका आयुक्त जगदीश के. एच. समाज कल्याण खात्याच्या उमा सालीगौडर, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, सामान्य प्रशासन उपायुक्त घंटी, पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी, पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, प्रवीण किल्लारी, गरीबी निर्मूलन विभागाचे संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
स्वच्छता कामगारांचे वेतन-निवृत्ती वेतन वेळेत द्या
स्वच्छता कामगारांना कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. याबाबतची माहिती विचारली असता 1972 पूर्वीच्या 40 निवृत्त स्वच्छता कामगारांना कायमस्वरुपी घरे देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. सध्या आझमनगर, नेहरुनगर, आनंदवाडी अशा विविध ठिकाणी 253 क्वॉर्टर्समध्ये स्वच्छता कामगार वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्या सर्व कामगारांना कायमस्वरुपी घरे देण्यात यावीत, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली. पण याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे देण्याची सूचना आयुक्तांनी केली. स्वच्छता कामगारांचे वेतन व निवृत्ती वेतन वेळेत द्यावे, अशी सूचना संघटनेच्यावतीने करण्यात आली. स्वच्छता कामगारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. स्वच्छता कामगारांसाठी महात्मा गांधी स्वयंरोजगार योजनेतून काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याची माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.