घरात लागणार्या वैद्यकीय उपकरणांपैकी एक म्हणजे डिजिटल थर्मामीटर. हे थर्मामीटर नीट स्वच्छ करायला हवं. थर्मामीटर स्वच्छ करण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी…
- ताप मोजण्यासाठी काही डिजिटल थर्मामीटर तोंडात ठेवावी लागतात. त्यामुळे अशा थर्मामीटरच्या वापरानंतर ती स्वच्छ करावी लागतात.
- थर्मामीटरचा टोकाचा भाग थंड पाण्याने स्वच्छ करा. हे टोक साधारण एक ते दोन मिनिटं थंड पाण्याखाली धरून ठेवा. अर्थात यावेळी थर्मामीटरच्या डिस्प्लेवर पाणी पडू देऊ नका.
- थर्मामीटर स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल वाईप्स किंवा रबिंग अल्कोहोलचा वापर करा. तोंडात जाणारं टोक नीट स्वच्छ करा. यासाठी मऊ कापड किंवा कापसाचा वापर करता येईल.
- थर्मामीटर स्वच्छ केल्यानंतर ते आत ठेवण्याआधी नीट वाळवून घ्या. थर्मामीटर हवेने वाळू द्या. कोणत्याही टॉवेल किंवा रुमालाने पुसणं शक्यतो टाळा.