प्रतिनिधी /म्हापसा
तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात 2016 सग्ली अवघ्याशा शंभर टन क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या सांळगाव येथील कचरा प्रकल्पाची सध्याची क्षमता वाढवून आता 250 टन करण्यात आल्याची माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी सांळगावात दिली.
वाढीव क्षमतेने व्याप्त येथील कचरा प्रकल्प येत्या महिन्यापासून पुर्ण क्षमतेने कार्यरत होणार असल्याचे मंत्री लोबो यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
दरम्यान, गोवा राज्य हे पर्यटन केद्र असल्या कारणाने येथील किनारी भागात दरदिवशी मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होत असतो, त्यामुळे सध्या पर्यटन मंत्रालयाच्या ताब्यात असलेली किनारा स्वच्छता मोहीम यापुढे सांळगांवातील कचरा व्यावस्थापन आपल्या हाती घेणार असल्याचे मंत्री लोबो यांनी यावेळी सांगितले
.यावेळी व्यासपीठावर गोवा कचरा व्यवस्थापने संचालक लेविंन्सन मार्टीन्स, गोवा राज्य औद्योगिक महामंडळाचे व्यवस्थापक संजीत प्रभुचोडणेकर, हिंदुस्थान वूस्ट मेनेजमेंटचे डॉ. संकेत धनेरिया तसेच शिवोली, सांळगाव, कळंगुट, आणी सुकुर पंचायतींचे विद्यमान सरपंच तसेच पंच सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
2022 पासून कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून सभोवतालच्या पंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील गोळा करण्यात आलेला कचरा येथील प्रकल्पापर्यत आणण्यासाठी स्वतःचे वाहन उपलब्ध नसल्यास महामंडळाकडून नाबार्डच्या आधारे अशा पंचायतींना स्वताचे गार्बेज ट्रक पुरविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री लोबो यांनी यावेळी दिली, तथापि, सधन पंचायत क्षेत्रातील कचरा योग्यवेळी योग्यप्रमाणात महामंडळाच्या स्वाधीन करण्यात अपयशी ठरणाऱया पंचायतींवर गोवा प्रदुषण महामंडळ कायद्यानुसार दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी पत्रकारांना दिली. सांळगावच्या कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या पठारावर उपस्थित पत्रकारांना मंत्री मायकल लोबो तसेच त्यांच्या अधिकारी वर्गानी पाहाणी करण्याबरोबरच माहिती दिली..