’’निमित्त महिला दिनाचे वापरूया पाऊच स्वच्छतेचे’’
मासिक पाळी हे नैसर्गिक चक्र असून ते स्त्रियांना मिळालेले वरदान आहे . प्रत्येक स्त्रीला या चक्रातून जावे लागते. पूर्वीच्या काळी पाळीमध्ये स्त्रिया कापड वापरत. पण ते सुद्धा वारंवार स्वच्छ करून पुन्हा वापरत. त्याच बरोबरीने पाळीमध्ये शरीराची स्वछता पण तेवढीच काळजीपूर्वक करणे आवश्यक असते.
पण, बदलत्या काळानुसार आणि धकाधकीच्या जीवनात बाजारात वेगवेगळय़ा कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन वापरण्यास सोपे आणि सहजरित्या उपलब्ध झाल्यामुळे त्याचा वापर प्रत्येक स्त्री / मुलगी करू लागली. डॉक्टर सांगतात की सॅनिटरी नॅपकिन्स हे प्रत्येकी 6 तासाला बदलणे आवश्यक आहे. नाहीतर त्यामुळे इन्फेक्शन, रॅशेस यांचा त्रास होतो.
पण, वापरलेले सॅनिटरी नॅपकिन शाळा, कॉलेज, ऑफिस, प्रवासात बदलणार कसे आणि बदललेले सोबत ठेवणार कसे किंवा कचऱयात उघडय़ावर टाकणार कसे, प्लास्टिक बंदीमुळे वापरलेले सॅनेटरी नॅपकिन कागदात गुंडाळून कशीही टाकली जात असे, त्यामुळे या कागदात काय आहे ? हे उघडल्याशिवाय लक्षात येत नसे . वापरलेले सॅनिटरी नॅपकिन उघडय़ावर टाकल्यामुळे प्राणी विस्कटून ते रस्त्यावर आणतात त्यामुळे पर्यावरणाला, मानवाला याचा धोका निर्माण होतो आणि नॅपकिन्स जाळल्याने हवेत प्रदूषण तयार होते आणि रोगराईला आमंत्रण मिळते तसेच कचऱयात टाकताना काय काळजी घेतली पाहिजे असे काही प्रश्न उभे राहिले. या सगळय़ांचा विचार करून ’’हॅप्पी ब्लीड’’ स्वच्छतेची नवी सुरुवात । नॅपकिन तुमचे, पाऊच आमचे।’ या संकल्पनेचा उगम झाला.
हॅप्पी ब्लीड हे पाउच तुम्ही तुमच्या बॅगमध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने ठेऊन वापरू शकता, यामुळे उघडय़ावर सॅनिटरी नॅपकिन फेकणाऱयांवर नक्की आळा बसेल, पब्लिक प्लेसमध्ये टॉयलेटमधून फ्लश करणे बंद होईल, कचरा वेचकांना सहज लक्षात येण्यासाठी लाल डॉट लावण्यात आला आहे. पर्यावरणाचा समतोल राहील असे तयार करण्यात आले आहे. ’’हॅप्पी ब्लीड’’ पाउचमध्ये तुम्ही वापरायचे प्रेश असे पॅकिंगचे सॅनिटरी नॅपकिन ठेऊ शकता आणि नंतर वापरलेले सॅनिटरी नॅपकिन हॅप्पी ब्लीड पाउचमध्ये घालून ते तुम्ही कचरा पेटीत टाकू शकता. तुम्ही प्रवासात असाल किंवा तुमच्या आजूबाजूला कचरा पेटी नसेल तर तुम्ही घरी आल्यावर ते पाउच कचरा पेटित टाकू शकता .
चला तर मग, महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या स्वतःपासून घराघरांतून ’’हॅप्पी ब्लीड’’ स्वच्छतेची नवी सुरुवात नॅपकिन तुमचे, पाउच आमचे वापरण्यास सुरुवात करूया .
-सीमा लिंगायत कुलकर्णी