कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील 1179 स्वच्छाग्रहिना प्रशिक्षणङ
प्रतिनिधी/ सातारा
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छाग्रही म्हणून काम करणाऱया कार्यकर्त्यांचे संपूर्ण राज्यात झुम ऍपद्वारे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा हेतू कोविड 19 या साथरोगाबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन करून स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणेस प्रवृत्त करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी जनजागृती करणे हा होता. राज्यस्तरावरून सातारा जिह्यातील 1179 स्वच्छाग्रहिना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये कोविड विषाणू संकल्पना, हातांची स्वच्छता, श्वसन संस्थेची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, अधिक जोखमीचे गट यांनी घ्यावयाची काळजी, रोग प्रसाराचा मार्ग मास्कचे प्रकार व उपयोग, मास्कची हाताळणी, गावपातळीवर काम करणाऱया व्यक्तींनी घ्यावयाची खबरदारी, वयोवृद्ध व्यक्ती, हृदयविकार, मधुमेह, फुफुसाचे विकार, मूत्रपिंडाचा विकार, गर्भवती महिला, लहान मुले यांनी घ्यावयाची दक्षता, कुटुंब व सार्वजनिक स्वच्छता यामध्ये पाणी साठवण, स्त्राsत स्वच्छता, शौचालयाचा वापर, मैलागाळ व्यवस्थापन, सर्वांसाठी सामाजिक अंतर, कोविड संभाव्य आणि बाधित व्यक्तीसंबंधी घ्यावयाची काळजी, विलगीकरण म्हणजे काय, घरातील उपचार, आजाराचे समज गैरसमज, मानहानी व भेदभाव याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणास युनिसेफचे जयंत देशपांडे, श्री बालाजी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, अजय राऊत, राजेश भोसले, ऋषिकेश शिलवंत यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी तालुका स्तरावरील गट संसाधन केंद्राचे कर्मचारी व जिल्हा पाणी स्वच्छता मिशनचे गणेश चव्हाण, रवींद्र सोनवणे, राजेश इंगळे यांनी परिश्रम घेतले. जिल्हयातिल स्वच्छता विभागातील अधिकारी यांनी पालघर व रायगड जिह्यातील स्वच्छग्रहिंना अपद्वारे मार्गदर्शन केले. उत्कृष्टपणे प्रशिक्षणाचे नियोजन केल्याबद्दल राज्यस्तरावरून वासोचे संचालक राहुल साकोरे, विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे व राज्य प्रशिक्षण समन्वयक विजय गवळी यांनी सातारा जिल्हा परिषद टिमचे कौतुक केले.