प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील मांडवी समुद्र किनारी मांडवी पर्यटन संस्था, रत्नागिरी नगर परीषद, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व कारुण्य मरीन एक्सपोर्ट संयुक्त वि
द्यमाने स्वच्छता मोहिम राबवण्यात आल़ी
मांडवी किनाऱयावरील स्वच्छता मोहीम शुक्रवारी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या यांच्या उपस्थितीत सुरु झाली. मांडवी पर्यटन संस्थेच्या आवहनाला प्रतिसाद देत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व कारुण्य मरीन एक्सपोर्टचे अधिकारी, कर्मचारी, मांडवी ग्रामस्थ, व्यवसायिक या अभियानामध्ये सहभागी झाले. यावेळी जमाझालेला सुमारे 3 डंपर कचरा नगरपालिकेने उचलला. हॉटेल सी पॅनच्या वतीने अभियानात सहभागी नागरीकांना चहा पाण्याच्sा व मिलिंद शिवलकर यांच्यावतीने वडापावचे वाटप करण्यात आले .
समुद्रकिनाऱयावर येणारे सांडपाणी, पार्किंग व्यवस्था, 80 फुटी हायवेवर वाहणारे गटार याबाबतही येथे चर्चा करण्यात आली यावेळी आरोग्यसभापती निमेश नायर मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर , नगरसेवक बंटी कीर, नितीन तळेकर , दया चवंडे , अल्ट्राटेक कंपनीचे डी एस चंद्रशेखर , नीरज खरे , अनिल पुराणीक , भुषण डहाणूकर , संतोष पाटील , अनिल त्रिपाठी , सुहास ठाकूरदेसाई , सुरेश पावसकर , रोहीत मायनाक , हर्ष दुडे , श्रेयस कीर , बंडय़ा सुर्वे , बिपिन शिवलकर , नरेश शिवलकर , संदिप तोडणकर ,विद्या वायंगणकर, छाया मोरे , श्वेता धनावडे , समीर शिवलकर , रसिका शिवलकर आदी उपस्थित होते.