प्रतिनिधी / कुर्डुवाडी
भारत सरकारच्या नगर विकास विभागामार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सोलापूर जिल्ह्यत कुर्डुवाडी ने २ रा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ सर्वेक्षण मध्ये २५००० लोकसंख्येच्या गटात कुर्डुवाडी शहर २०१८ पासून सहभाग घेत आहे. २०१८ साली १४३वा, २०१९ मध्ये १२३वा, २०२०मध्ये ३७ वा तर २०२१ मध्ये ३५ वा क्रमांक आला असून कुर्डुवाडी शहर २०१५ साली हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले व सन २०१८ ते सन २०२० या कालावधीत ओडीएफ प्लस चा बहुमान मिळवला व सन २०२१ मध्ये ओडीएफ प्लस प्लस चा बहुमान पटकावला. पुढील सर्वेक्षणामध्ये शहराची स्थिती सुधार करून उत्तम कामगिरी करण्याचा निर्धार नगरपालिकेने केला.
सोलापुर शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, उपनगराध्यक्षा उर्मिला हरीभाऊ बागल, आरोग्य सभापती राधिका मनोज धायगुडे, व सर्व नगरसेवक यांचे सहकार्य लाभले व त्यांनी नगरपालिका कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
या सर्वेक्षणामध्ये कार्यालयीन अधिक्षक अतुल शिंदे, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण, नोडल अधिकारी कोमल वावरे, शहर समन्वयक अभिजित पवार, फय्याज शेख, मुकादम सुरेश कदम, शिवाजी खवळे,ब्रिजपाल वाल्मीकि, व स्वच्छता दूत सागर बागल,अविनाश गोडगे,आकाश गोडगे,अक्षय तोमर,दत्ता गायकवाड,विक्रम बागल,संदीप ढावरे, व सर्व सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.