प्रतिनिधी/ कराड
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणाऱया स्वच्छ सर्वेक्षण 2020 सालचा निकाल 20 ऑगस्टला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे जाहीर करणार आहेत. 2019 मध्ये या स्पर्धेत कराड नगरपरिषदेने एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. 2020 सालच्या स्पर्धेतही कराड नगरपरिषद देशात अव्वल क्रमांकावर असेल, असा विश्वास जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात यादव यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे पारितोषिक वितरण व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणच्या निकालाबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. गतवर्षी कराड नगरपालिकेने कराडकर नागरिक व महिलांच्या सहकार्याच्या जोरावर देशातील सुमारे चार हजार शहरांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. या वर्षीही कराड नगरपरिषद या स्पर्धेत अव्वल क्रमांकावर असणार आहे. केंद्रीय नगरविकास व शहरी आवास मंत्रालयाकडून नगरपालिकेस याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे कराड नगरपरिषदेचा क्रमांक निश्चित आहे. याची घोषणा स्वतः नरेंद्र मोदी हे करणार असून कराड नगर परिषदेचे हे भाग्य असणार आहे. कराड नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये 2018 व 2019 या दोन्ही वर्षात चांगली कामगिरी केली होती. 2020 या वर्षीही नगरपालिका चांगली कामगिरी करेल, असा आम्हाला विश्वास आहे.
कराडकर नागरिक विशेषतः महिलांनी कराड नगरपालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांना भरघोस पाठिंबा दिला. त्यामुळे कराड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अग्रेसर राहिली आहे. कराड नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अथक परिश्रम यामागे आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका व गटनेते, स्वच्छता दूत, 105 सामाजिक संस्था, त्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, पत्रकार यांचेही सहकार्य लाभले आहे. विशेषता मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा हे यश मिळवण्यात सिंहाचा वाटा आहे, असे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.
कराड शहरात 100 टक्के कचरा संकलन, 100 टक्के विलगीकरण, 100 टक्के प्रक्रिया करण्यात नगरपालिका यशस्वी झाली आहे. त्यामुळे पालिकेस कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. कृष्णा नदीचे सौंदर्यीकरण, संपूर्ण शहरात भूमिगत गटार योजना, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा शेतीसाठी पुनर्वापर, अत्याधुनिक सार्वजनिक शौचालये, सुमारे 1000 घरात ओल्या कचऱयावर प्रक्रिया, बारा डबरे येथील जुना कचरा हटवून उभारलेले स्वच्छता प्रेरणा उद्यान अशा विविध पातळ्यांवर नगरपालिकेने यश मिळवले आहे.
2019 मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर 2020 मध्ये प्रथम क्रमांक कायम राखणे आव्हानात्मक होते. देशभरातील विविध नगरपालिकांनी चांगली तयारी करत स्पर्धेत भाग घेतला होता. या परिस्थितीत नगरपालिकेने 2020 मध्ये आणखी जोमाने काम केले आहे. त्यामुळे पालिकेचा अव्वल क्रमांक निश्चित आहे.
कराडकर नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कटिबद्ध 16 केआरडी 9
सलग दोन वर्षे पुरस्कार मिळाला असला तरी एवढय़ावर न थांबता यापुढील काळातही स्वच्छतेत कराड नगरपरिषद अग्रेसर राहून कराडकर नागरिकांना उत्कृष्ट नागरी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास या निमित्ताने राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला आहे.
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची कराड मधील कारकीर्द संस्मरणीय- यादव 16 केआरडी 10
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी आघाडीवर राहून काम केले आहे. त्यांच्या विविध संकल्पनांना कराडकरांनी भरघोस पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कराडकराचे शतशः आभार. कराड शहरात गेल्या तीन वर्षात झालेली विविध कामे यशाच्या साच्यात बसवून कराड पालिकेला देदीप्यमान यश मिळवून देण्याचे अतुलनीय कार्य मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे. ते ख्रया अर्थाने मॅच विनर आहेत. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे कराडमधील कार्य नागरिक कदापि विसरणार नाहीत. कराडमध्ये त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त करत डांगे यांच्या कामाचा गौरव केला आहे.