निपाणीत स्वतंत्र कचरा संकलनासाठी डबेवाटप नाही
प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपालिकेकडून विविध पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कचरा समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जात आहे. यासाठी ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जात आहे. मात्र यात अजूनही अडथळे असल्याचे पाहायला मिळत आहे.
घरामध्ये जमा होणाऱया कचऱयाचे ओला व सुका असे स्वतंत्र विघटन करून तो कचरा घंटागाडीला देण्याचा सरकारी आदेश आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी नगरपालिकेच्या वतीने सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात गल्लीगल्लीमध्ये जात ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे देण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. शिवाय सफाई कर्मचाऱयांकडून कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जात आहे. असे असले तरी नगरपालिकेकडून नागरिकांना स्वतंत्र कचरा संकलनासाठी होणारे डबे वाटप आता होणार नसल्याचे समजते.
दोन वर्षांपूर्वी ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने डबे वाटप करण्यात येणार होते. त्यानुसार डबे खरेदी करून काही डब्यांचे वाटप करण्यात आले. मात्र अजूनही हजारो डबे वाटपाअभावी पडून आहेत. सध्या शहर उपनगरातील कुटुंबाची संख्या विचारात घेतल्यास नगरपालिकेच्या वतीने सर्वांना वाटप करता येणे शक्मय नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून डबे खरेदी करावेत व स्वतंत्रपणे कचरा संकलित करून तो नगरपालिकेच्या घंटागाडीला द्यावा, असे आवाहन केले जात आहे.
दररोज 25 टन कचरा संकलित
शहरात दररोज सुमारे 25 टन कचरा इतका संकलित होतो. त्यामुळे या कचऱयाचे स्वतंत्रपणे वर्गीकरण होऊन त्यातून खतनिर्मिती करण्यासाठी नगरपालिकेने तयारी केली आहे. पण अजूनही अनेक कुटुंबांमध्ये स्वतंत्रपणे कचरा संकलित होताना दिसत नाही. त्यामुळे कचऱयाचे वर्गीकरण करताना सफाई कामगारांना अडचणी येत आहेत.
सध्या डबे वाटपाचा विचार नाही
पालिकेच्या हद्दीतील कुटुंबांची संख्या 17 हजारावर आहे. अशावेळी सर्वांना डबेवाटप करता येणे शक्मय नाही. तसेच नगरपालिकेच्यावतीने नागरिकांना डबे वाटप करावे, असा आदेश नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून स्वतःहून कचरा स्वतंत्रपणे संकलित करून घंटागाडीला द्यावा. पुढील काळात डबे खरेदी करणे आवश्यक वाटल्यास ते खरेदी करून वाटप करण्यात येईल, असे यासंदर्भात बोलताना नगरपालिका आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी सांगितले.