युक्रेनमध्ये सत्तापालटाचा रशियाचा फॉर्म्यूला ः सर्वोच्च पदासाठी युवहेन मुरायेव्ह दावेदार
युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्याच्या तिसऱया दिवशी 10 लाख लोकांचे पलायन झाले आहे. कीव्हवर मोठय़ा प्रमाणात बॉम्बवर्षाव होतोय. युक्रेनियन सैन्याला शस्त्र खाली ठेवण्याचा सल्ला दिला आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष जेलेंस्की यांच्या सरकारला पायउतार करत स्वतःच्या हातचे बाहुले असणारे सरकार स्थापन करू शकतात.
रशियाचे समर्थक राहिलेले युक्रेनचे काही नेता आणि माजी सैन्याधिकारी रशियाच्या हातचे बाहुले ठरू शकतात. युक्रेनच्या स्थापनेच्या सुमारे 3 दशकांदरम्यान रशिया समर्थक अनेक पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदासीन राहिले आहेत. युक्रेनच्या डोनबास क्षेत्रात रशियाचे पूर्ण समर्थन आहे. अशा स्थितीत युक्रेनच्या राजकीय सारिपाटावर स्वतःची प्यादी बसविण्याची तयारी गतिमान केली आहे. माजी खासदार येवहेन मुरायेव्ह यांना सर्वात प्रबळ दावेदार मानले जातेय.
चिंताजनक आहे रशियाची रणनीति
रशिया युक्रेनमध्ये स्वतःच्या हातचे बाहुले असणारे सरकार स्थापन करू पाहत आहे. स्वतःच्या भविष्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार युक्रेनच्या लोकांना आहे. लोकशाही पद्धतीने होणाऱया निवडणुकीद्वारे हे कार्य व्हावे. या अधिकाराच्या रक्षणसाठी अमेरिका आणि त्याचे सहकारी युक्रेनच्या जनतेसोबत आहेत असे उद्गार अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एमिली हार्न यांनी काढले आहेत.
नेत्यांशी रशियाकडून संपर्क
रशियाच्या गुप्तचर यंत्रणेने रशिया समर्थक मानल्या जाणाऱया अनेक नेत्यांशी कित्येकदा संपर्क साधला आहे. युक्रेनचे माजी पंतप्रधान मेकोला अजारोव्ह यांचेही नाव यात सामील असल्याचे ब्रिटनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.