नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राज्यसभा सदस्यत्वाचा राजजनामा दिलेले भाजपचे नेते स्वपन दासगुप्ता यांना पुन्हा राज्यसभेवर नामनिर्दिष्ट सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. त्यांच्यासह ज्येष्ठ विधितज्ञ महेश जेठमलानी (ख्यातनाम दिवंगत विधितज्ञ राम जेठमलानी यांचे पुत्र) यांनाही राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले आहे. ही माहिती जेठमलानी यांना स्वतः पत्रकारांना दिली. स्वपन दासगुप्ता यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तथापि, त्यांची राज्यसभेतील कामगिरी पाहून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.