ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. स्वयं सतर्कता आणि आपली सामूहिक शक्तीच कोरोनाचा पराभव करेल, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात देशवासियांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. या व्हेरिएंटवर संशोधक सातत्याने संशोधन करत आहते. या व्हेरिएंटचा रोज नवा डेटा त्यांना मिळत आहेत. ओमिक्रॉनविरोधात लढायचं असेल तर स्वयं सतर्कता आणि स्वयं शिस्त या दोन गोष्टीचं पालन करा. हीच ओमिक्रॉन विरोधातील ही मोठी शक्ती आहे. आपली सामूहिक शक्तीच कोरोनाचा पराभव करेल. सध्या देशात लसीकरणाचा 140 कोटी डोसचा टप्पा पार झाला आहे. ही भारतासाठी गौरवाची बाब आहे.
दरम्यान, यावषीही मी परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. या कार्यक्रमाची नोंदणी MyGov.in वर 28 डिसेंबरपासून सुरू होणार असून, 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही मोदींनी केले.