प्रतिनिधी / बेळगाव
डॉक्टर, नर्स, आशा कार्यकर्त्या आणि पोलीस कर्मचारी हे कोरोना वॉरियर्स म्हणून काम करत आहेत. सर्वसामान्य जनतेचे ते संरक्षण करत आहेत. त्यामुळे त्यांना काही तरी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत पोलिसांना सॅनिटायझर व मास्कचे वितरण बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघ, टिळकवाडी यांच्यावतीने करण्यात आले.
संघाचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विनायक बडीगेर यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष होंगल यांनी केले. संतोष भेंडीगेरी यांनी आभार मानले.