प्रतिनिधी/बेळगाव
स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघटनेतर्फे रविवारी ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी, माजी महापौर नागेश सातेरी, अशोक देशपांडे, माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी उपस्थित होते. ध्वजवंदन व दीपप्रज्वलन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
दरवषी 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरूवात झाली होती. या निमित्त स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने दरवषी हुतात्मा चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
रविवारी सकाळी क्रांतीकारकांच्या फोटोचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरूवात झाली. अध्यक्ष राजेंद्र कलघटगी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.