बेळगाव : सदाशिवनगर येथील समृद्धी सेवा संस्थेच्या स्फुर्ती स्वाधार गृहातून मेघा मल्लप्पा हळबर (वय 22, रा. हारुगेरी, ता. रायबाग) ही तरुणी दि. 22 जानेवारी 2022 रोजी बेपत्ता झाली आहे. याबाबत यमनव्वा फकिराप्पा गवाई यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
मेघा ही या स्वाधार केंद्रामध्ये राहत होती. ती दि. 22 रोजी सायंकाळी 7.30 वाजता संरक्षण भिंतीवरून उडी टाकून बेपत्ता झाली आहे. तिची उंची 5 फुट 2 इंच, ती रंगाने गहूवर्णीय आहे. साधारण बांधा, कन्नड भाषा बोलते. तिने जाताना अंगावर ग्रे रंगाचा टॉप व निळय़ा रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. सदर तरुणीविषयी कोणाला माहिती असल्यास एपीएमसी पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.