जयसिंगपूर / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते व नेते मंडळींनी एकत्रित येऊन शुक्रवारी पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ असून निर्माण झालेले गैरसमज दूर करीत यापुढेही शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मिळून एकदिलाने ,एकजुटीने व एकमताने चळवळीचे काम करायचे चळवळीच्या माध्यमातून राज्यकर्त्यांच्या वर अंकुश ठेवण्यासाठी विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी राजू शेटटी, प्रा. डाॅ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, डाॅ. महावीर अक्कोळे, पै. विठ्ठल मोरे, भाऊ साखरपे, जनार्दन पाटील, अजित पवार, डाॅ. श्रीवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.